शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

यंदा कांदा उत्पादन वाढीचे संकेत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2020 12:23 AM

लासलगाव : यंदा रब्बी कांदा उत्पादनात उच्चांकी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अतिरिक्त पुरवठा देशाबाहेर जाण्यासाठी निर्यातबंदी हटवण्याची गरज आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने जारी केलेल्या पहिल्या फलोत्पादन अनुमानानुसार यंदा उच्चांकी रब्बी उत्पादन अपेक्षित आहे. रब्बी कांदा क्षेत्रात १८ टक्के, तर उत्पादनात २० टक्के वाढीचे अनुमान असून, फेब्रुवारीत निर्यात खुली न झाल्यास अतिरिक्त उत्पादन डोकेदुखी ठरणार असल्याचे कांदा खरेदी क्षेत्रात काम करणारे तज्ज्ञ सांगतात.

ठळक मुद्देआर्थिक फटका बसण्याची शक्यता : निर्यात खुली न केल्यास डोकेदुखी वाढणार

लासलगाव : यंदा रब्बी कांदा उत्पादनात उच्चांकी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अतिरिक्त पुरवठा देशाबाहेर जाण्यासाठी निर्यातबंदी हटवण्याची गरज आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने जारी केलेल्या पहिल्या फलोत्पादन अनुमानानुसार यंदा उच्चांकी रब्बी उत्पादन अपेक्षित आहे. रब्बी कांदा क्षेत्रात १८ टक्के, तर उत्पादनात २० टक्के वाढीचे अनुमान असून, फेब्रुवारीत निर्यात खुली न झाल्यास अतिरिक्त उत्पादन डोकेदुखी ठरणार असल्याचे कांदा खरेदी क्षेत्रात काम करणारे तज्ज्ञ सांगतात.देशातील रब्बी कांद्याचे उत्पादन १८९ लाख टनापर्यंत वाढणार असल्याचे केंद्रीय फलोत्पादन विभागाचे म्हणणे आहे. यामुळे देशांतर्गत गरजेच्या तुलनेत कांद्याचा मोठा अतिरिक्त साठा निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर वेळीच निर्यातबंदी मागे न घेतल्यास मार्च ते आॅक्टोबर या आठ महिन्यांच्या कालावधीत महाराष्ट्रासह देशातील कांदा उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. फलोत्पादन अनुमानात १९-२० हंगाम वर्षांत एकूण कांदा उत्पादन २४४ लाख टन अनुमानित आहे. त्यात खरीप आणि लेट खरीप मिळून ५५ लाख टन, तर रब्बीतून १८९ लाख टन अशी वर्गवारी आहे. जानेवारी महिन्यात जिल्ह्यात तसेच राज्यातील कांदा बाजारपेठेत आवक लक्षणीय होत आहे. तसेच देशातल्या कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यात कांदा आवक वाढली आहे. त्यामुळे तेथील मागणी कमी झाली आहे. तसेच या वर्षी प्रथमच महाराष्ट्राइतकीच कांदा आवक गुजरात राज्यातदेखील होत आहे. दक्षिणेकडील राज्यातील कांदा दिल्ली, हरियाणा, पंजाब व पश्चिम बंगालमध्ये तेथील कांदा स्वस्त दरात मिळत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कांदा मागणी कमी होत असल्याने भाव कमी झाले आहेत.नोव्हेंबर ते मार्च या महिन्यांत अनुक्र मे खरीप आणि रेट खरीप कांदा बाजारात असतो. खरीप कांद्यात टिकवण क्षमता नसते. हार्वेस्टिंगनंतर तातडीने त्याची विक्र ी करावी लागते. रब्बी कांद्यात टिकवण क्षमता असते. पारंपरिक कांदा चाळीत सहा ते आठ महिने रब्बी कांदा साठवता येतो. या वर्षी उत्पादनवाढीची मोठी समस्या ही रब्बी कांद्यात निर्माण होणार आहे. आजघडीला बाजारात लेट खरीप कांद्याची आवक होत आहे. यंदा लेट खरिपाचे (रांगडा) उत्पादन कमी असल्याने सध्याचे बाजारभाव फेब्रुवारी २०१९ तुलनेत किफायतीशीर आहेत. लेट खरिपाचा कांदा मार्चच्या मध्यापर्यंत बाजारात सुरू असतो.मागील वर्षी हंगामात १८-१९ मध्ये रब्बी कांद्याखाली७.६ लाख हेक्टर क्षेत्र होते, त्या तुलनेत हंगाम १९-२० मध्ये उच्चांकी नऊ लाख हेक्टरपर्यंत क्षेत्र वाढण्याचे अनुमान आहे. म्हणजेच, १८ टक्क्यांनी रब्बी कांद्याखालील क्षेत्र वाढणार आहे. यंदाच्या खरिपातदेखील पाण्याच्या उपलब्धतेमुळे आगाप लागणी वाढतील. गेल्या खरिपातील तेजीमुळे यंदाच्या खरिपातही कांद्याकडे शेतकऱ्यांचे कल राहील, असे दिसते. भारतात दरमहा दोन ते तीन लाख टनापर्यंत कांदा निर्यात क्षमता विकसित झाली आहे. मार्च ते आॅक्टोबर या आठ महिन्यांत सरासरी अडीच लाख टन कांदा निर्यात झाला तरी ३२ लाख टन वाढीव उत्पादनामधून २० लाख टनाचा वाढीव उत्पादकांचा कांदा देशाबाहेर जाईल, असा अंदाज आहे.साधारणपणे मार्च ते आॅक्टोबर महिन्यादरम्यान देशात रब्बी कांद्याचा पुरवठा असतो. मार्च महिन्यात लेट खरीप (रांगडा) आणि आगाप रब्बी (उन्हाळ) एकाच वेळी हार्वेस्टिंगला येऊन महाराष्ट्रासह देशभरातील बाजार समित्यांमध्ये माल येण्याची शक्यता आहे. या बरोबरच फेब्रुवारीतही लेट खरिपाच्या पुरवठ्यात सुधारणा होऊन जानेवारीच्या तुलनेत सरासरी बाजारभाव कमी राहण्याची शक्यता दिसते.

 

 

टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरी