शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
3
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
4
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
5
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
6
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
7
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
8
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
9
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
10
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
11
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
12
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
13
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
14
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
15
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
16
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
17
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
18
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
19
PHOTOS: तूफ़ान से लड़ने में मज़ा और ही कुछ है; अभिनेत्री नव्हं 'प्रसिद्ध' अधिकाऱ्याची भटकंती
20
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा

चाळीत युरिया टाकल्यामुळे १२० क्विंटल कांदा सडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 10:44 PM

देवळा : कांद्याला विक्र मी बाजारभाव मिळत असल्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण असतांनाच तालुक्यातील भऊर येथील एका शेतकऱ्याच्या कांदा चाळीत अज्ञात समाजकंटकाने युरिया टाकल्यामुळे या शेतकºयाचे जवळपास पाच लाख रु पयांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी वर्ग भयभीत झाला असून डोळ्यात तेल घालून चाळीतील कांद्याचे संरक्षण करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

ठळक मुद्देदेवळा : अज्ञात इसमाचे कृत्य ; सुमारे पाच लाखांचे नुकसान

देवळा : कांद्याला विक्र मी बाजारभाव मिळत असल्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण असतांनाच तालुक्यातील भऊर येथील एका शेतकऱ्याच्या कांदा चाळीत अज्ञात समाजकंटकाने युरिया टाकल्यामुळे या शेतकºयाचे जवळपास पाच लाख रु पयांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी वर्ग भयभीत झाला असून डोळ्यात तेल घालून चाळीतील कांद्याचे संरक्षण करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.गत दोन वर्षापासून कांदा उत्पादक शेतकरी कांद्याचे बाजारभाव कोसळल्यामुळे आर्थिक नुकसान सोसत असतांना आठवडाभरापूर्वी कांद्याचे बाजारभाव वाढण्यास सुरु वात झाली. यामुळे चाळीत साठवणूक केलेला उन्हाळी कांदा शेतकºयांनी विक्र ीसाठी बाजारात आणण्यास सुरुवात केली. बाजार भावात दररोज वाढ होत असल्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले.याच दरम्यान तालुक्यातील भऊर येथील विष्णू बापू आहेर या शेतकºयाने आपल्या राहत्या घरासमोर कांदा चाळीत उन्हाळी कांदा साठवणुक केलेला होता. चाळीतील हा कांदा सडू लागल्याचे आहेर यांच्या लक्षात आले. पावसाळी वातावरणामुळे सर्वत्र कांदा खराब होत असल्यामुळे चाळीतील कांदा खराब होऊ लागला असावा असा अंदाज त्यांनी काढला.त्यांनी रविवारी (दि.२२) हा खराब कांदा चाळीबाहेर काढण्यास सुरूवात केली असता कोणी अज्ञात समाजकंटकाने आपल्या चाळीत कांद्यावर युरिया टाकल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. चाळीत साठवलेला चार ट्रॅक्टर ट्रॉली कांदा (अंदाजे १२० क्विंटल) खराब झाल्याने आहेर यांचे आजच्या बाजारभावाने जवळपास पाच लाख रु पयांचे नुकसान झाले आहे. यामुळे परीसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.दुष्काळामुळे पाणी टंचाई असतांना पाण्याचे काटेकोर नियोजन करून मेहनतीने कांदा पिकाचे उत्पादन घेतले होते. कांद्याला समाधानकारक बाजार भाव मिळायला लागताच अज्ञात व्यक्तीने माझ्या कांदा चाळीत रासायनिक खत युरिया टाकल्याने माझे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या बाबत देवळा पोलिस स्टेशनला तक्र ार देणार आहे.ङ्क्त - विष्णू आहेर, शेतकरी.