शुक्ल यजुर्वेद माध्यंदिन ब्राह्मण संस्थेत गुणगौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 12:09 AM2018-05-31T00:09:23+5:302018-05-31T00:09:23+5:30

येथील शुक्ल यजुर्वेदिय माध्यंदिन ब्राह्मण संस्थेच्या गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ, विद्यार्थी व पालकांची कान, नाक, घसा, रक्तदाब आदी संपूर्ण तपासणी कार्यक्रम सोमवारी (दि. २८) उत्साहात पार पडला.

 Shukla Yajurveda Pride in the Middle Brahmin Institute | शुक्ल यजुर्वेद माध्यंदिन ब्राह्मण संस्थेत गुणगौरव

शुक्ल यजुर्वेद माध्यंदिन ब्राह्मण संस्थेत गुणगौरव

Next

नाशिक : येथील शुक्ल यजुर्वेदिय माध्यंदिन ब्राह्मण संस्थेच्या गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ, विद्यार्थी व पालकांची कान, नाक, घसा, रक्तदाब आदी संपूर्ण तपासणी कार्यक्रम सोमवारी (दि. २८) उत्साहात पार पडला. डॉ. आशुतोष मुंगी, डॉ. पंकज भट, डॉ. प्रियंका भट या तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणी व मार्गदर्शन केले.  याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. राहुल सुलाखे, डॉ. दिलीप बेलगावकर, मुख्याध्यापक शुभांगी बेळगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पहिली ते पदव्युत्तर अभ्यासक्रमातील यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे सामाजिक कामात चांगले योगदान देणाऱ्या त्र्यंबकचे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, अ‍ॅड. श्रीकांत गायधनी, सतीश शुक्ल, नरेंद्र धारणे, संजय कुलकर्णी आदींचा अ‍ॅड. भानुदास शौचे, राजन कुलकर्णी, माधवराव भणगे, मालती कुरुंभट्टी, राजश्री शौचे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. लीना चांदवडकर यांनी स्वागत केले. याप्रसंगी रवींद्र देव, रोहिणी जोशी, अपर्णा चौघुले, प्रा. लक्ष्मीकांत भट, मोहिनी भगरे, प्रमोद मुळे, निखिल देशपांडे आदी उपस्थित होते.

Web Title:  Shukla Yajurveda Pride in the Middle Brahmin Institute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक