शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

ढोल-ताशांच्या गजरात जल्लोषपूर्ण मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 01:20 IST

अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर नाशिककरांनी लाडक्या गणरायाला वाजतगाजत भावपूर्ण निरोप दिला. नाशिकमध्ये काढण्यात आलेली मुख्य विसर्जन मिरवणूक आदर्श ठरली,

नाशिक : अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर नाशिककरांनी लाडक्या गणरायाला वाजतगाजत भावपूर्ण निरोप दिला. नाशिकमध्ये काढण्यात आलेली मुख्य विसर्जन मिरवणूक आदर्श ठरली, ती केवळ डीजे आणि गुलाल उधळण्याला फाटा दिल्यामुळेच. पारंपरिक पद्धतीने ढोल-ताशा वादनात बाप्पांची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत सहभागी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे एकापेक्षा एक सरस चित्ररथ लक्षवेधी ठरले.  जुने नाशिकमधील फाळके रोडवरून दुपारी बारा वाजता पालकमंत्री गिरीश महाजन व महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून रविवारी (दि.२३) मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. उपमहापौर प्रथमेश गिते, खासदार हेमंत गोडसे, आमदार देवयानी फरांदे, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे, स्वामी संविदानंद सरस्वती, भक्तिचरणदास महाराज, गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे, नगरसेवक शाहू खैरे, विनायक पांडे, गजानन शेलार, लक्ष्मण सावजी आदी उपस्थित होते. नियोजित वेळेपेक्षा सुमारे तासभर मिरवणुकीच्या शुभारंभाला उशीर झाला त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी नाराजी व्यक्त केली. सर्वच गणेश मंडळांनी डीजे वापराला फाटा देत उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन क रत पारंपरिक वाद्यवादनाला पसंती दिली. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीत नाशिकच्या प्रसिद्ध ढोल-ताशांचा आवाज घुमला. पारंपरिक पोषाखात तरु ण-तरु णी कमरेला ढोल-ताशा बांधून वाजतगाजत बाप्पाला निरोप देण्यासाठी विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते.यावेळी ध्वजधारी भगवे ध्वज घेऊन ढोल-ताशांच्या तालावर थिरकत होते.ढोल-ताशांच्या गजरात जल्लोषपूर्ण मिरवणूक(पान-१ वरुन)मिरवणुकीत शहरातील एकूण लहान-मोठ्या २० गणेशोत्सव मंडळांनी सहभाग घेतला. प्रारंभी महापालिकेचा मानाचा गणपती प्रथम क्रमांकावर होता. दुसऱ्या क्रमांकावर रविवार कारंजा मित्रमंडळाचा मानाचा चांदीचा गणपतीच्या चित्ररथावर लोकमान्य टिळक हे रथाचे सारथी असल्याचा देखावा सादर केला होता. तसेच या मंडळासोबत माउली प्रतिष्ठानचे ढोलपथक वाद्य वादन करत होते. तृतीय क्रमांकावर गुलालवाडी व्यायामशाळेचे मंडळ होते. या मंडळाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भराडी देवीचा देखावा सादर केला. या मंडळाच्या चिमुकल्यांचे लेजीम पथक तर युवकांच्या ढोल पथकाने लक्ष वेधून घेतले. यानंतर भद्रकाली कारंजा मित्रमंडळाचे श्रीमंत साक्षी गणेश मंडळासोबत शिवराय वाद्यपथक होते. पाचव्या क्रमांकावर पेठरोडवरील श्रीमान सत्यवादी मित्रमंडळ व शिवराय वाद्यपथक वाद्यवादन करत होते. सहाव्या क्रमांकावर सरदार चौक मित्रमंडळ व त्यांचे रामनगरी ढोल-ताशा पथक संचलन करीत होते.त्यांच्या पाठोपाठ सूर्यप्रकाश नवप्रकाश मित्रमंडळाची नाशिकच्या राजाची २१ फुटी गणेशमूर्ती व विघ्नहरण वाद्यपथक मिरवणुकीत सामील झाले होते. त्यानंतर रोकडोबा मित्रमंडळ महिलांच्या जिजाऊ वाद्यपथकासोबत संचलन करीत होते. या मंडळाने आक र्षक पुष्प सजावट करून त्यात बाप्पांच्या मूर्तीचा देखावा सादर केला. मेनरोड येथील शिवसेवा युवक मित्रमंडळाने आकर्षक भव्य गरुडावर आरूढ गणरायांचा देखावा सादर करत तालरुद्र ढोलपथकासह मिरवणुकीत सहभाग घेतला. तसेच या मंडळाने सादर केलेल्या कोंबड्याच्या नृत्यानेही लक्ष वेधून घेतले. अशोकस्तंभावरील शिवमुद्रा मित्रमंडळाने शिवाज्ञा ढोल पथकासह सहभागी होऊन २४ फुटी मानाच्या राजाची गणेशमूर्ती सादर केली. मुंबई नाका येथील युवक मित्रमंडळाने शिवसाम्राज्य ढोलताशा पथकासह सहभागी होऊन पुष्प सजावटीतून आकर्षक कालियामर्दनचे रूप साकारून बाप्पाची मूर्ती त्यामध्ये दाखविली. तसेच दंडे हनुमान मित्रमंडळाने शिवनाद ढोल पथकासह मिरवणुकीत सहभाग घेतला. यांसह शैनेश्वर युवक समिती, पिंपळपारावरील नेहरू चौक मित्रमंडळ, नवीन आडगाव नाका सांस्कृतिक कला-क्रीडा मंडळ, वेलकम सहकार्य मित्रमंडळ, श्री गणेश मूकबधीर मित्रमंडळ, गजानन मित्रमंडळ, द्वारकामाई मित्रमंडळाने मिरवणुकीत सहभाग घेतला. पोलीस प्रशासनाकडे २१ मंडळांची नोंद झाली होती. त्यापैकी दुर्गा मित्रमंडळ काही कारणास्तव सहभागी होऊ शकले नाही.‘गुलालवाडी’ने जोपासला जातीय सलोखाजुन्या नाशकातील गुलालवाडी व्यायामशाळेचे मंडळ दुपारी दूधबाजारातील हेलबावडी मशिदीजवळ येताच ‘अजान’ सुरू झाली. यावेळी मंडळाच्या पदाधिकाºयांसह कार्यकर्त्यांनी तत्काळ ढोलवादन थांबविले. एक मिनिटापर्यंत अजान चालली तोपर्यंत मंडळाचे सर्व वाद्यवृंद शांत व स्तब्धपणे उभे होते. यावेळी आलम खान नावाच्या जागरूक नागरिकाच्या ही बाब लक्षात आली व त्याने त्वरित मोबाइलच्या माध्यमातून व्हिडीओ चित्रीकरण सुरू केले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर दिवसभर गाजला. गुलालवाडी मंडळाच्या या सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत जातीय सलोखा जोपासला.सुरक्षित वाहतुकीसाठी जनप्रबोधनपोलीस आयुक्तालय व सूर्यप्रकाश-नवप्रकाश मित्रमंडळाच्या संयुक्त विद्यमाने मिरवणुकीत मोबाइलचा अतिवापर कसा धोकादायक आहे? तसेच वाहतुकीदरम्यान मोबाइलचा वापर अपघाताला निमंत्रण देणारा ठरू शकतो? मोबाइलच्या वापरामुळे मैदानी खेळांचा विसर पडत चालला आहे, असा जिवंत देखावा विसर्जन मिरवणुकीत सादर केला. या देखाव्याने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. असा होता मार्गगणेश विसर्जन मिरवणूक जुने नाशिक फाळकेरोडवरून सुरू झाली. दूधबाजार, शहीद अब्दुल हमीद चौक, भद्रकाली भाजीबाजार, बादशाही कॉर्नर, गाडगे महाराज पुतळा, मेनरोड, धुमाळ पॉइंट, रेडक्रॉस सिग्नल, एम.जी.रोड, अशोकस्तंभाहून रविवार कारंजा, अहल्यादेवी होळकर पूल, मालेगाव स्टॅन्डवरून पंचवटी कारंजामार्गे सरदार चौकातून म्हसोबा पटांगणावर रात्री दहा वाजेच्या सुमारास मिरवणूक विसर्जित करण्यात आली.‘रामनगरी’च्या विदेशी तरुणींनी धरला भगवारामनगरी ढोल पथकामध्ये दोन ते तीन विदेशी तरुणी वादक सहभागी झाले होते. या विदेशी तरुणींनी हातात भगवा ध्वज घेत ध्वजधारीची भूमिका पार पाडली. तसेच कमरेला ढोल बांधून बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत वादक म्हणून सहभागही नोंदविला. त्यांचे वाद्यवादन व ठेक्याने लक्ष वेधले.हेल्मेट परिधान करून मुलांनी वाजविले टाळडे केअर शाळेच्या मुलांनी हातात टाळ घेत मिरवणुकीत सहभाग घेतला. टाळवादन करत या बालगोपाळांच्या पथकाने मिरवणुकीत रंग भरला. दरम्यान, नाशिक शहर वाहतूक पोलिसांच्या वतीने सर्र्व मुलांना हेल्मेट देण्यात आले. यावेळी मुलांनी हेल्मेट परिधान करत टाळ वाजवून नागरिकांना ‘हेल्मेट है जरुरी, ना समझो इसे मजबुरी’ असा प्रबोधनात्मक स्वाइन फ्लूची धास्तीशहरात स्वाइन फ्लू या आजाराचे रुग्ण आढळून येत असल्याने त्याची भीती मिरवणुकीतही पहावयास मिळाली. मिरवणुकीत सहभागी पोलीस अधिकारी, कर्मचाºयांनी खबरदारीचा उपाय म्हणून नाका-तोंडाला मास्क लावल्याचे दिसून आले. तसेच मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी विविध संघटनांकडून पिण्याचे पाणी वाटप केले जात होते. यावेळीदेखील काही स्वयंसेवकांनी तोंडाला रुमाल बांधले होते. गणेश विसर्जन मिरवणुकीसह गोदाकाठ, तपोवन आदी परिसरात स्वाइन फ्लूची धास्ती पहावयास मिळाली.—ध्वनी प्रदूषणावर पोलिसांचे लक्षविसर्जन मिरवणुकीमध्ये ढोल-ताशांचा गजरामुळे ध्वनीमर्यादेची पातळी ओलांडण्याची भीती प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली होती. यावेळी ध्वनीमर्यादा तपासण्यासाठी पोलिसांकडून ध्वनी डेसिबल मापक यंत्राचा वापर मिरवणूक मार्गावर करण्यात आला. भद्रकाली पोलिसांच्या गुन्हे शोध पथकासह विशेष साध्या वेशातील पोलिसांकडे ध्वनी मर्यादा तपासण्याची जबाबदारी होती.भोंगेवाले ‘नाना’मागील वर्षी गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे साउंड सिस्टिमसह नगरसेवक गजानन शेलार यांच्या दंडे हनुमान मित्रमंडळाने सहभाग घेतला होता. यामुळे भद्रकाली पोलिसांनी ‘डीजेवाले नानां’वर गुन्हा दाखल केला होता. यावर्षी शेलार यांच्या मंडळाने खबरदारी घेत उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून मिरवणुकीत भोंग्यांसह सहभाग नोंदविला. त्यामुळे ‘भोंगेवाले नाना’ अशी चर्चा मिरवणुकीत रंगली होती.  पालकमंत्र्यांनी बडविला ढोलमिरवणुकीच्या शुभारंभप्रसंगी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह कैलास मठाचे स्वामी संविदानंद सरस्वती, भक्तिचरणदास महाराज यांनी ढोल वाजवून आनंद व्यक्त केला. तसेच मिरवणूक शहीद अब्दुल हमीद चौकात पोहचताच महाजन यांना ठेका धरण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनी यावेळी आयुक्त तुकाराम मुंढे यांचेही बोट धरत ठेका धरण्याचा आग्रह केला; मात्र मुंढे यांनी एक पाऊल मागे जाणे पसंत केले. यावेळी गजानन शेलार यांच्या साथीने महाजन यांनी ठेका धरत लक्ष वेधले.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवGirish Mahajanगिरीश महाजनganpatiगणपतीenvironmentवातावरणPoliceपोलिस