माणुसकी दाखवणे महागात पडले! ऑटो चालकाला मदत केल्यामुळे बस चालकाने नोकरी गमावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 17:00 IST2025-01-17T16:58:20+5:302025-01-17T17:00:15+5:30

सोशल मीडियावर ऑटो चालकाला बस चालक मदत करत असल्याचे दिसत आहे, या घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Showing humanity cost a lot Bus driver loses job for helping auto driver in nashik | माणुसकी दाखवणे महागात पडले! ऑटो चालकाला मदत केल्यामुळे बस चालकाने नोकरी गमावली

माणुसकी दाखवणे महागात पडले! ऑटो चालकाला मदत केल्यामुळे बस चालकाने नोकरी गमावली

आपल्याकडे अनेक वाहनांचे रस्त्यावर मध्येच इंधन संपल्याची प्रकरणे समोर येतात. यावेळी आपण एकतर वाहन तिथंच ठेवून इंधन घेऊन येतो किंवा रोडवरच मदत मागतो. सध्या एका ऑटोचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना नाशिकमधील आहे, एका रिक्षाचालकाचे इंधन संपल्यामुळे त्याला मदत म्हणून बस चालकाने एका पायाने ऑटो पुढे ढकलत घेऊन गेल्याचे दिसत आहे. ही मदत आता बस चालकाला महागात पडली आहे. यात आता या बसचालकाचं मोठं नुकसान झाले आहे.  नाशिक महानगर परिवहन महामंडळाने या बस चालकाला सिटी लिंक सेवेतून काढून टाकले आहे. या घटनेची सर्वत्र एकच चर्चा आहे.

'तो' व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी, काकाने बोलवून घेतलं हॉटेलवर; रूममध्ये जाताच तरुणीने...

काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये, १३ जानेवारी २०२५ रोजी सिटीलिंक चालकाने एक रिक्षा ओढली होती. म्हणजेच, सिटीलिंक बसचा ड्रायव्हर आणि कंडक्टर पेट्रोल पंपावर रिक्षा पायाने पुढ ढकलत गेले. यामुळे बस ड्रायव्हरचे सोशल मीडियावर कौतुक झाले. पण या व्हिडिओचे गांभीर्य पाहून सिटीलिंक प्रशासनाने तातडीने या प्रकरणाची चौकशी सुरू केली. आणि संबंधित एजन्सीला दोषी चालक वाहकाला सिटीलिंक सेवेतून काढून टाकण्याचे आदेश दिले.

प्रकरणाची गांभीर्य घेऊन चौकशी केली

नाशिक महानगर पालिकेच्या बस प्रसिद्ध आहेत. यामुळे सिटीलिंक बस सेवा नाशिकच्या सामान्य जनतेशी जोडलेली आहे. म्हणूनच, सिटीलिंक आरामदायी, किफायतशीर भाडे, नवीन सुविधा आणि प्रवाशांची सुरक्षितता या गोष्टींना प्राधान्य देऊन भविष्याची योजना आखत आहे. याप्रमाणे, १३ जानेवारी २०२५ रोजी, सिटीलिंक बस चालक रिक्षा पुढे ढकलत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सिटीलिंक प्रशासनाने तात्काळ संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली आहे.

१३ जानेवारी २०२५ रोजी, बस क्रमांक एमएच १५ जीव्ही ७९३१ ही पिंपळगाव ते नवीन सीबीएस मार्गावर जात असताना, सिटीलिंक कार्यालयाकडून कोणताही पूर्वसंपर्क न येता किंवा पूर्वकल्पना न देता, बस चालक, ईसीएफ वाहकाने एचएएल गेटजवळ एका थांबलेल्या रिक्षाला मदत म्हणून पायाने पुढे ढकलू लागला, सुदैवाने, या घटनेत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही परंतु नियमांचे उल्लंघन झाले, सिटीलिंक प्रशासनाने घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने प्रकरणाची चौकशी करुन या प्रकरणी बस चालकावर कारवाई केली.

Web Title: Showing humanity cost a lot Bus driver loses job for helping auto driver in nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.