प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेला अल्प प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 00:26 IST2019-02-10T22:55:11+5:302019-02-11T00:26:32+5:30
यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये दोन हेक्टरच्या आतील क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून सहा हजार रूपयांची तरतूद करण्यात आली. निवडणुका तोंडावर असल्याने त्याची तत्काळ अंमलबजावणी करण्यासाठी मंगळवारी बारा फेब्रुवारीपर्यंत आधार कार्ड व राष्ट्रीयीकृत बँकेच्या पासबुकाची झेरॉक्स जमा करणे अनिवार्य असताना शेतकºयांनी सदर योजनेस मध्यम प्रतिसाद दिला आहे.

ओझर येथे प्रधानमंत्री किसान सन्मान निधीसाठी कागदपत्र जमा करताना शेतकरी. समवेत मंडल अधिकारी प्रशांत तांबे, तलाठी उल्हास देशमुख, सचिव नामदेव गुरु ळे आदी.
ओझर : यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये दोन हेक्टरच्या आतील क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून सहा हजार रूपयांची तरतूद करण्यात आली. निवडणुका तोंडावर असल्याने त्याची तत्काळ अंमलबजावणी करण्यासाठी मंगळवारी बारा फेब्रुवारीपर्यंत आधार कार्ड व राष्ट्रीयीकृत बँकेच्या पासबुकाची झेरॉक्स जमा करणे अनिवार्य असताना शेतकºयांनी सदर योजनेस मध्यम प्रतिसाद दिला आहे.
कृषी गणना २०१५-१६ नुसार शेतकरीनिहाय डिजिटल स्वरूपात यादी उपलब्ध आहे. सदर यादीमध्ये गावातील तलाठी यांनी त्या गावातील खातेदारांचे कुटुंबनिहाय वर्गीकरण करणे बंधनकारक असून, त्यानंतर सदर कुटुंबाचे लागवडीलायक एकूण धारण क्षेत्र दोन हेक्टर आहे त्यांची स्वतंत्र यादी तयार करून दिलेल्या वेळेत वरील माहिती भरून मागविण्यात आली आहे.