दुकाने, कारखाने लक्ष्य : मद्याच्या दुकानावर चोरट्यांचा डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 15:07 IST2020-08-10T15:04:15+5:302020-08-10T15:07:03+5:30
दुकानाचे लोखंडी ग्रील व शटर वाकवून आत प्रवेश केला. दुकानातील काउंटरच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली तसेच इतर ठिकाणी ठेवलेली एकुण ९५ हजार रूपयांची रोकड चोरट्यांनी हातोहात लंपास

दुकाने, कारखाने लक्ष्य : मद्याच्या दुकानावर चोरट्यांचा डल्ला
नाशिक : शहरात लॉकडाउन शिथिल झाल्यापासून गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दुकाने, कारखाने, बॅँका, गुदामे चोरट्यांकडून फोडले जात असून लाखो रूपयांचा माल गायब केला जात आहे.
मद्याचे दुकान फोडून चोरट्यांनी एक लाख रूपयांची रोकड लंपास केल्याचा प्रकार दिंडोरीरोड परिसरात शनिवारी (दि.८) मध्यरात्री घडली. याप्रकरणी किशोर बबन ठाकरे यांनी तक्र ार दाखल केली आहे. त्यानुसार त्यांचे म्हसरूळच्या हद्दीत दिंडोरी रोडवर समृद्धी अपार्टमेंट येथे दिंडोरी लिकर्स वाईन शॉप आहे. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात संशयितांनी दुकानाचे लोखंडी ग्रील व शटर वाकवून आत प्रवेश केला. दुकानातील काउंटरच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली तसेच इतर ठिकाणी ठेवलेली एकुण ९५ हजार रूपयांची रोकड चोरट्यांनी हातोहात लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द जबरील लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खिडकीचे गज कापून कंपनीत ७० हजाराची चोरी
नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीत चोरीचे प्रकार सुरू असून शनिवारी (दि.८) रात्री एका कंपनीचे खिडकीचे गज कापून चोरट्यांनी ७० हजार रूपये किंमतीचे १५० किलो कॉपर चोरून नेले. याप्रकरणी सतीश राजपुत (रा. एकतानगर, उत्तमनगर) यांनी तक्र ार दाखल केली आहे. त्यानुसार कंपनीला सुट्टी असल्याचा गैरफायदा घेत शुक्र वारी रात्री ते रविवारी पहाटेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी कंपनीच्या प्रसाधनगृहावरुन आत प्रवेश केला. स्टोर रुमच्या खिडकीचे गज कापून तेथे ठेवलेले ७० हजार रूपये किंमतीचे १५० किलो कॉपरचे बंडल चोरून नेले. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.