नाशिक-पुणे महामार्गावर पेटली शिवशाही बस, सुदैवाने जीवितहानी नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2022 09:49 IST2022-11-02T09:43:44+5:302022-11-02T09:49:11+5:30

सिन्नर येथे थांबल्यानंतर ती पुढे संगमनेरच्या दिशेने मार्गस्थ झाली.

Shivshahi bus caught fire on Nashik-Pune highway, no casualties | नाशिक-पुणे महामार्गावर पेटली शिवशाही बस, सुदैवाने जीवितहानी नाही

नाशिक-पुणे महामार्गावर पेटली शिवशाही बस, सुदैवाने जीवितहानी नाही

- शैलेश कर्पे/सचिन सांगळे

सिन्नर  : नाशिकहून पुण्याच्या दिशेने जाणारी राज्य परिवहन महामंडळाची शिवशाही बस सकाळी आठ वाजेच्या सुमारास सिन्नर जवळील माळवाडी (शिवाजीनगर) शिवारात जळून खाक झाली.

नाशिक येथून सकाळी सात वाजेच्या सुमारास प्रवासी घेऊन शिवशाही बस पुण्याच्या दिशेने निघाली होती. सिन्नर येथे थांबल्यानंतर ती पुढे संगमनेरच्या दिशेने मार्गस्थ झाली. तथापि, माळवाडी (शिवाजीनगर) शिवारात अचानक बसमधून धूर निघू लागल्याने चालकाने बस रस्त्याच्या कडेला उभी केली आणि सर्व प्रवासी बस खाली उतरले. 


क्षणार्धात बस पेटली. बसमधून आगेच्या ज्वाला बाहेर पडू लागल्या सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप बचावले. सदर आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सर्व प्रवासी सुखरूप असल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. तथापि, बस जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Web Title: Shivshahi bus caught fire on Nashik-Pune highway, no casualties