शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्रभर करणार ६१ हजार वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 03:45 PM2021-07-11T15:45:50+5:302021-07-11T15:46:40+5:30

घोटी : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे कार्यध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिक जिल्हा वाहतूक सेना व इगतपुरी तालुका वाहतूक सेनेच्या वतीने ६१ हजार वृक्षारोपण संकल्प मोहीम घोटीत राबविण्यात आली. इगतपुरी तालुक्यातील खंबाळे येथे शनिवारी (दि.१०) वृक्षारोपण करण्यात आले. सर्व महाराष्ट्रभर ६१ हजार वृक्षारोपण करण्यात येणार असल्याचे उपनेते बबन घोलप यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन ते होते. तसेच मुंढेगाव येथील जिंदाल पॉलीफील्म कंपनीच्या गेटवर वाहतुक शाखेचे उदघाटन करण्यात आले.

Shiv Sena will plant 61,000 trees across Maharashtra | शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्रभर करणार ६१ हजार वृक्षारोपण

वृक्षारोपण संकल्प मोहीम समारंभात बोलताना बबन घोलप समवेत, निवृत्ती जाधव, काशिनाथ मेंगाळ, कुलदीप चौधरी, राजाभाऊ नाठे, रामदास भोर, संजय आरोटे आदी.

googlenewsNext
ठळक मुद्देसंकल्प मोहिमेला इगतपुरी तालुक्यातून सुरुवात

घोटी : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे कार्यध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिक जिल्हा वाहतूक सेना व इगतपुरी तालुका वाहतूक सेनेच्या वतीने ६१ हजार वृक्षारोपण संकल्प मोहीम घोटीत राबविण्यात आली. इगतपुरी तालुक्यातील खंबाळे येथे शनिवारी (दि.१०) वृक्षारोपण करण्यात आले. सर्व महाराष्ट्रभर ६१ हजार वृक्षारोपण करण्यात येणार असल्याचे उपनेते बबन घोलप यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन ते होते. तसेच मुंढेगाव येथील जिंदाल पॉलीफील्म कंपनीच्या गेटवर वाहतुक शाखेचे उदघाटन करण्यात आले.

या कार्यक्रमा प्रसंगी व्यासपीठावर महाराष्ट्र सेनेचे अध्यक्ष उदय दळवी, शिवसेनेचे सुधाकर बडगूजर, उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, माजी आमदार काशीनाथ मेंगाळ, महाराष्ट्र वाहतूक सेनेचे प्रमुख अजीम सयद, देवानंद बिरारी, सभापती सोमनाथ जोशी, संजय जाधव, उपतालुका प्रमुख कुलदीप चौधरी, राजाभाऊ नाठे, सरपंच रामदास भोर, संजय आरोटे, माजी सभापती रघुनाथ तोकडे केरु देवकर, दिलीप चौधरी आदी उपस्थित होते.

इगतपुरी तालुक्यात शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना घोटीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वाहतुक सेनेचे इगतपुरी तालुका अध्यक्ष पंढरी गायकर, उपाध्यक्ष भगीरथ काळे, योगेश टाकळकर, सुधाकर पाळदे, भास्कर खातळे, दिलीप तोकडे, संपत दरणी, वामन साळुंखे, राहुल काळे, खंडु आव्हाड, संदीप खातळे, अक्षय साळुंखे, सुनील आव्हाड, समाधान तांबे, नामदेव तळपाडे, तुकाराम चौधरी, संदीप शिंगोटे, भगवान गव्हाणे आदी उपस्थित होते.
 
Web Title: Shiv Sena will plant 61,000 trees across Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.