शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेनेचा तहसीलवर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 18:55 IST2019-11-25T18:55:04+5:302019-11-25T18:55:23+5:30
दिंडोरी : विविध मागण्यांचे निवेदन

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेनेचा तहसीलवर मोर्चा
दिंडोरी : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी यासह विविध मागण्यांसाठी दिंडोरी तालुका शिवसेनेच्यावतीने तहसिल कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
पंचायत समिती कार्यालयापासून मोर्चास प्रारंभ झाला. निळवंडीरोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, वणीरोड मार्गे मोर्चा तहसिल कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी तहसिलदार कैलास पवार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शेतक-यांना कर्जमाफी द्यावी, सातबारा उतारा कोरा करावा, नुकसानभरपाई तात्काळ मिळावी आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुनिल पाटील, माजी आमदार धनराज महाले, उपजिल्हाप्रमुख अरु ण वाळके, तालुकाप्रमुख सतिष देशमुख, सहसंपर्कप्रमुख पांडुरंग गणोरे, महिला आघाडी तालुकाप्रमुख अस्मिता जोंधळे, युवा सेना उपजिल्हाप्रमुख निलेश शिंदे, तालुकाप्रमुख किरण कावळे, सभापती एकनाथ खराटे, उपसभापती कैलास पाटील, शहरप्रमुख संतोष मुरकुटे, प्रभाकर जाधव, नाना मोरे, देवानंद धात्रक, जगन सताळे, शिवाजी शार्दुल, अविनाश वाघ, एकनाथ काळोखे, मुन्ना जाधव, अमोल कदम, अरु ण गायकवाड, पप्पु देशमुख, अशोक निकम आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.