शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
2
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
3
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
4
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
5
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
6
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
7
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
8
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
9
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
10
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
11
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
12
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
13
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
14
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
15
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
16
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
17
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
18
‘प्रत्येक विधानसभेत ५०,००० मतं कापण्याचा कट’, अखिलेश यादवांचे भाजपा, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप  
19
हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय
20
मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण..."
Daily Top 2Weekly Top 5

‘पंचक’विषयी सेनेच्या नेत्यांचे प्रेम उफाळले : प्रेम शुक्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 18:10 IST

सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, राबर्ट वढेरा, अहमद पटेल या पंचकपासून देश मुक्त करा, असे बाळासाहेब त्यावेळी म्हणाले होते; मात्र सध्या डोळ्यासमोर काही वेगळीच परिस्थिती आहे.

ठळक मुद्दे...तर मोदींच्या काळात गोरगरिबांना ‘लाभ’भाजपाचे मिशन ३००पेक्षा अधिक जागांचे आहे भाजप देश व देशाचे संविधान वाचविण्यासाठी लढा देत आहे.

नाशिक : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या अखेरच्या दसरा मेळाव्याच्या भाषणात देशाला ‘पंचक’पासून मुक्त करण्याची इच्छा बोलून दाखविली होती; मात्र सध्या शिवसेनेच्या काही नेत्यांच्या मनात ‘पंचक’चे उफाळून आलेले प्रेम अनाकलनीय असल्याचा टोला भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रेम शुक्ला यांनी पत्रकार परिषदेत लगावला. बाळासाहेबांच्या वक्तव्याचा शिवसेनाला विसर पडल्याची टीकाही त्यांनी केली.भाजपाची दिल्ली येथे नुकतीच राष्ट्रीय कार्यकारिणी घोषित करण्यात आली. या पार्श्वभूमीवर शुक्ला हे राज्याच्या दौऱ्यावर आहे. यानिमित्त रविवारी त्यांनी शहराच्या भाजपा कार्यालयात पत्रकार परिषद बोलाविली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी विरोधक हे परिवाराची लढाई स्वत:चे अस्तित्व वाचविण्यासाठी लढत असल्याचे सांगितले. तसेच भाजप देश व देशाचे संविधान वाचविण्यासाठी लढा देत आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, राबर्ट वढेरा, अहमद पटेल या पंचकपासून देश मुक्त करा, असे बाळासाहेब त्यावेळी म्हणाले होते; मात्र सध्या डोळ्यासमोर काही वेगळीच परिस्थिती आहे. या पंचकाविषयी सेनेचे उफाळलेले प्रेम बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तव्यावर पाणी फिरविणारे असल्याचे शुक्ला यावेळी म्हणाले. २०१९ची निवडणूक भाजपा स्वबळावर लढणार असून, यंदाचे मिशन ३००पेक्षा अधिक जागांचे आहे आणि भाजपाचे कमळ या सर्व जागांवर फुलल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.गांधींच्या काळात नव्हे, तर मोदींच्या काळात गोरगरिबांना ‘लाभ’कॉँग्रेसच्या काळात राजीव गांधी पंतप्रधान असतानाही तितक्या प्रभावीपणे विविध योजनांची अंमलबजावणी होऊ शकली नाही. त्या योजना ज्या लाभार्थ्यांसाठी काढल्या गेल्या त्यांच्यापर्यंत त्याचा लाभ पोहचलाच नाही, उलट ज्यांना गरज नव्हती अशांनीच या योजनांच्या माध्यमातून मलिदा लाटल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात जनतेच्या योजना या जनतेपर्यंत थेट पोहचविल्या जात असून, स्वस्त धान्यदेखील आधार कार्डासोबत जोडले गेल्याने पारदर्शक व सक्षमपणे गोरगरिबांना धान्याचा पुरवठा केला जात आहे. एकूणच मोदींच्या काळात सरकारी योजना अधिक बळकट झाल्या व लाभार्थ्यांना त्याचा थेट लाभ मिळाल्याचा दावा शुक्ला यांनी यावेळी बोलून दाखविला.

 

टॅग्स :NashikनाशिकBJPभाजपाcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे