नाशकात शिवसेनेकडून पेढे वाटून नामांतराचा आनंदोत्सव साजरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2023 16:49 IST2023-02-25T16:48:16+5:302023-02-25T16:49:14+5:30
नाशिक : औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे नाव बदलून धाराशिव असे करन्यात आल्याने हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख ...

नाशकात शिवसेनेकडून पेढे वाटून नामांतराचा आनंदोत्सव साजरा
नाशिक: औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे नाव बदलून धाराशिव असे करन्यात आल्याने हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार झाल्याबद्दल शिंदे गटाच्या शहर शिवसेनेतर्फे शनिवारी ( दि.25) आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मुख्य पोस्ट कार्यालयासमोरील पक्ष कार्यालयासमोर नागरिकांना पेढे वाटन्यात आले.
यावेळी, शिवसेना जिल्हाप्रमुख अजयजी बोरस्ते, महानगरप्रमुख प्रविण (बंटी) तिदमे, महिला आघाडी लक्षमीताई ताठे, महानगरप्रमुख अस्मिताताई देशमाने, उपजिल्हा प्रमुख शिवाजी भोर, युवासेना जिल्हाप्रमुख रुपेश पालकर, महानगरप्रमुख दिगंबर नाडे, पश्चिम विधानसभा संघटक बबलु सूर्यवंशी, योगेश बेलदार, अक्षय कलंत्री, सुधाकर जाधव, शरदचंद्र नामपुरकर, अमित खांदवे, अमित मांडवे, नितीन लासुरे, राजेंद्र मोहिते, संदीप लभडे, धवल डरांगे, बबलु पवार व सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.