शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात लोकलच्या आगमनाची उत्सुकता शिगेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 13:31 IST

किसन काजळे /नांदूरवैद्य -: इगतपुरी तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या अस्वली, पाडळी या रेल्वे स्थानकावर काही दिवसांतच कल्याण ते नाशिक ही लोकलसेवा प्रवाशांसाठी दाखल होत असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहचल्याचे चिञ पाहावयास मिळत आहे.

किसन काजळे /नांदूरवैद्य -: इगतपुरी तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या अस्वली, पाडळी या रेल्वे स्थानकावर काही दिवसांतच कल्याण ते नाशिक ही लोकलसेवा प्रवाशांसाठी दाखल होत असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहचल्याचे चिञ पाहावयास मिळत आहे. कधी काळी केवळ पॅसेंजर आणि शटल या केवळ दोन गाड्या थांबणा-या इगतपुरी तालुक्यातील घोटी, पाडळी, अस्वली या स्थानकाचे आता रूप पालटू लागले आहे. लवकरच या मार्गावर कल्याण नाशिक लोकल सेवेला सुरूवात होणार आहे. ही लोकल येत्या काही दिवसात चालू होणार असल्याने या तिन्ही स्थानकावर विविध कामे करण्याला वेग आला आहे. यापूर्वी केवळ नामधारी ठरलेली ही स्थानके येत्या काही काळात उद्घोषणा व प्रवाशाच्या गर्दीने गजबजून जाणार आहे. इगतपुरी स्थानक वगळता तालुक्यात घोटी, पाडळी, अस्वली ही स्थानके आहेत. ही स्थानके भुसावळ विभागांतर्गत येत असल्याने अनेक वर्षांपासून उपेक्षितच होती. या स्थानकावर केवळ मनमाड इगतपुरी शटल आणि भुसावळ मुंबई पॅसेंजर या दोनच गाड्या थांबत असल्याने प्रवाशांनी या स्थानकाकडे पाठ फिरवली होती. दरम्यान, गेली अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या कल्याण नाशिक लोकल सेवेची मागणी यावर्षी पूर्ण झाल्याने रेल्वे प्रशासनाने या स्थाकाकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे.लोकल सेवा सुरू होण्याच्या पूर्वी इगतपुरी, घोटी, पाडळी आणि अस्वली स्थानकाचा कायापालट करण्यात येत असून यात घोटी स्थानकात पादचारी पूल आणि नवीन प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यात येत आहे. तर पाडळी स्थानकावर नवीन तिकीटघर बांधण्यात येणार आहे. या स्थानकावरही पादचारी पूल बांधण्यात येणार असून त्या कामाचीसुरु वात करण्यात आली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक