मालेगावी गोळीबारात शेंदुर्णीचा तरुण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 23:55 IST2021-07-08T23:54:36+5:302021-07-08T23:55:16+5:30

मालेगाव : मुंबई-आग्रा महामार्गावर दुचाकीवरून आलेल्या तिघा अज्ञातांपैकी एकाने गोळीबार केल्याने जावीद रज्जाक खाटीक (३८, रा. शेंदुर्णी हातोडा, ता. जामनेर, जि. जळगाव) हे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. त्यांच्यावर धुळे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पवारवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Shendurni youth injured in Malegaon shooting | मालेगावी गोळीबारात शेंदुर्णीचा तरुण जखमी

मालेगावी गोळीबारात शेंदुर्णीचा तरुण जखमी

ठळक मुद्देया संदर्भात अलीम सलीम खाटीक यांनी पोलिसात फिर्याद दिली

मालेगाव : मुंबई-आग्रा महामार्गावर दुचाकीवरून आलेल्या तिघा अज्ञातांपैकी एकाने गोळीबार केल्याने जावीद रज्जाक खाटीक (३८, रा. शेंदुर्णी हातोडा, ता. जामनेर, जि. जळगाव) हे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. त्यांच्यावर धुळे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पवारवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अलीम सलीम खाटीक यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. गुरुवारी (दि. ८) पहाटे पावणे चार वाजण्याच्या सुमारास गोळीबाराचा प्रकार घडला. जावीद खाटीक व अलीम खाटीक हे पिकअपवरून (क्रमांक एम. एच. ४८, एजी ८७६१) शेळ्या भरून कल्याणकडे जात असताना मुंबई - आग्रा महामार्गावर पवारवाडी शिवारात विना क्रमांकाच्या दुचाकीवरून आलेल्या तिघा जणांनी पिकअपच्या दरवाजाजवळ येत गाडी थांबविण्यास सांगितले. गाडी थांबविली नसल्याने दुचाकीवर बसलेल्या एकाने बंदूक काढून गोळीबार केला. यात जावीद खाटीक हे जखमी झाले आहेत. रिजवान पार्क ते जनता सायझिंग दरम्यान ही घटना घडली. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी भेट दिली. संशयित आरोपींच्या शोधासाठी पथक नियुक्त करण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक व्ही. एल. भोये हे करीत आहेत.

Web Title: Shendurni youth injured in Malegaon shooting