शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक कारखान्याचे गा-हाणे शरद पवारांच्या कानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 19:20 IST

राज्यातील अनेक कारखान्यांबरोबरच नाशिक जिल्ह्यातील निफाड, नाशिक साखर कारखाना गेल्या काही वर्षांपासून बंद पडला आहे. नाशिक साखर कारखाना गेल्या सात वर्षांपासून बंदस्थितीत असून, या कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिन बाराशे मेट्रिक टन आहे. एकेकाळी भरभराट असलेल्या या कारखान्याचे

ठळक मुद्देदिल्लीत चर्चा : लवकरच मुख्यमंत्र्यांसमवेत बैठककारखाना बंद पडल्यामुळे बॅँकेच्या कर्जाचा डोंगर वाढत चालला

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : आर्थिक परिस्थितीने जर्जर झालेला नाशिक सहकारी साखर कारखाना पूर्ववत सुरू करण्यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी मंगळवारी सकाळी राष्टÑवादीचे नेते खासदार शरद पवार यांची भेट घेतली. कारखाना बंद पडल्यामुळे सभासद शेतकऱ्यांची कुचंबना झाली असून, शेकडो कामगारांवर उपासमारीची वेळ आली असल्याची बाब पवार यांना पटल्यामुळे लवकरच कारखाना सुरू करण्यासाठी मंत्रालयात मुख्यमंत्री, वित्तमंत्री व सहकारमंत्र्यांची संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन पवार यांनी दिले.

राज्यातील अनेक कारखान्यांबरोबरच नाशिक जिल्ह्यातील निफाड, नाशिक साखर कारखाना गेल्या काही वर्षांपासून बंद पडला आहे. नाशिक साखर कारखाना गेल्या सात वर्षांपासून बंदस्थितीत असून, या कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिन बाराशे मेट्रिक टन आहे. एकेकाळी भरभराट असलेल्या या कारखान्याचे नाशिक, सिन्नर, इगतपुरी व त्र्यंबकेश्वर या चार तालुक्यांत सतरा हजार सभासद आहेत. कारखान्याने जिल्हा बॅँकेकडून कोट्यवधींचे कर्ज घेतले असून, कारखाना बंद पडल्यामुळे बॅँकेच्या कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे. त्यामुळे बॅँकेने कारखान्यावर जप्ती आणली असून, शेकडो कामगारही बेकार झाले आहेत ही सर्व माहिती शरद पवार यांना देण्यात आली. कारखाना पुन्हा सुरू झाल्यास ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल त्याचबरोबर जिल्हा बॅँकेचे कर्जफेड होऊन बॅँकेचीही आर्थिक परिस्थिती दुरुस्त होऊ शकेल. राज्य सरकारने कारखाना सुरू करण्यासाठी कर्जाची हमी घ्यावी, कारखाना सुरू करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही यावेळी शरद पवार यांच्याकडे करण्यात आली. नाशिक कारखाना सुरू करण्याबाबत लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सहकारमंत्री व वित्तमंत्र्यांची संयुक्तबैठक घेण्याची ग्वाही पवार यांनी यावेळी हेमंत गोडसे, तानाजी गायधनी, दिनकर पाटील यांना दिले.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक