शरद पवारांनी आमच्या कृतीला समर्थन द्यावे; आम्ही ‘त्यांचे’च कार्यकर्ते - छगन भुजबळ
By श्याम बागुल | Updated: August 25, 2023 16:29 IST2023-08-25T16:28:34+5:302023-08-25T16:29:28+5:30
अजित पवार हे आमचे नेते आहेत हीच आमचीही तीच भूमिका आहे. त्यामुळे आमच्या कृत्याला शरद पवार यांनी समर्थन द्यावे असेही भुजबळ यांनी सांगितले.

शरद पवारांनी आमच्या कृतीला समर्थन द्यावे; आम्ही ‘त्यांचे’च कार्यकर्ते - छगन भुजबळ
नाशिक : राष्ट्रवादीत कोणतीही फूट पडलेली नाही, अजित पवार हेच आमचे नेते आहेत या शरद पवार यांच्या विधानाचे मंत्री छगन भुजबळ यांनी स्वागत केले आहे. अजित पवार हे छगन भुजबळ, धनंजय मुंडे आदींचे साऱ्यांचे नेते असतील तर आम्ही देखील शरद पवार यांचे कार्यकर्ते असून, आता फक्त त्यांनी आमच्या कृत्याला समर्थन द्यावे अशी अपेक्षाही भुजबळ यांनी व्यक्त केली आहे.
शरद पवार व सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीवरून केलेल्या वक्तव्यावरून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यापार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि.२५) येथे पत्रकारांशी बोलतांना भुजबळ यांनी, पक्षात कोणतीही फूट पडलेली नाही. फक्त एक गट सरकारमध्ये सामील झाला आहे हे पवार यांनी केलेले विधान देखील योग्यच असल्याचे म्हटले आहे. अजित पवार हे आमचे नेते आहेत हीच आमचीही तीच भूमिका आहे. त्यामुळे आमच्या कृत्याला शरद पवार यांनी समर्थन द्यावे असेही भुजबळ यांनी सांगितले.
कांदा प्रश्नी पियुष गोयल यांच्याशी चर्चा
केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांच्याशी कांद्याच्या प्रश्नावर चर्चा केली असून, सध्या जिल्ह्यात नाफेडने २० खरेदी केंद्र सुरू केले आहेत. मी सकाळी लासलगाव, विंचूर बाजार समितीच्या सभापतींशी बोललो आहे. कांदा खरेदी सुरूळीत सुरू झाली आहे. शेतकऱ्यांनी कांदा माल बाजार समितीत पाठविण्यास सुरूवात केली आहे. केंद्र सरकार नाफेड मार्फत दोन लाख टन कांदा खरेदी करणार असल्याने गोयल यांना आणखी खरेदी केंद्रे सुरू करण्याबाबत चर्चा झाली आहे. साधारणत: येत्या दोन दिवसात ३२ केंद्रे सुरू होतील.