शांतीगिरी महाराज मनसेच्या वाटेवर?; लोकसभा निवडणुकीसाठी हालचाली

By संजय पाठक | Published: March 7, 2024 03:41 PM2024-03-07T15:41:10+5:302024-03-07T15:41:43+5:30

राज ठाकरे यांच्याकडे मागितली वेळ, लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मागणारे आध्यात्मिक गुरू भाजपाकडे असल्याचे दिसते आहे. मात्र, शांतीगिरी महाराज यांनी मनसेकडे कल दाखवल्याचे दिसत आहे.

Shantigiri Maharaj will join MNS?; Raj Thackeray at Nashik visit for Lok sabha | शांतीगिरी महाराज मनसेच्या वाटेवर?; लोकसभा निवडणुकीसाठी हालचाली

शांतीगिरी महाराज मनसेच्या वाटेवर?; लोकसभा निवडणुकीसाठी हालचाली

नाशिक : लोकसभा मतदारसंघासाठी अनेक आध्यात्मिक गुरू, महंत यंदा निवडणूक रणांगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. बाबाजी भक्त परिवाराचे शांतीगिरी महाराजदेखील रिंगणात उतरणार आहेत. नाशिक किंवा छत्रपती संभाजीनगर अशा दोनपैकी एका मतदारसंघापैकी एका ठिकाणी ते लढणार असले तरी त्यांनी निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची वेळ मागितल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मागणारे आध्यात्मिक गुरू भाजपाकडे असल्याचे दिसते आहे. मात्र, शांतीगिरी महाराज यांनी मनसेकडे कल दाखवल्याचे दिसत आहे. राज ठाकरे नाशिकमध्ये तीन दिवसांच्या दौऱ्यावर येत आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्याचा निर्णय त्यांनी घेतला असला तरी अद्याप उमेदवारी निश्चित नाही. तुम्ही तयारी करा मी उमेदवारीचे बघून घेईल, असे राज ठाकरे यांनी गेल्या वेळी नाशिकच्या दौऱ्यात घेतलेल्या बैठकीत सांगितले होते. त्यातच आता प. पू. १००८ महामंडालेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज यांनी नाशिकमध्ये राज ठाकरे यांच्या भेटीची वेळ मागितल्याने वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

Web Title: Shantigiri Maharaj will join MNS?; Raj Thackeray at Nashik visit for Lok sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.