आठवर्षीय बालकावर लैंगिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 18:36 IST2018-10-07T18:34:15+5:302018-10-07T18:36:23+5:30

नाशिक : खेळणी व खाऊचे आमिष दाखवून आठ वर्षाच्या चिमुरड्यावर ३८ वर्षीय इसमाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना रविवारी (दि़७) सकाळी सातपूर कॉलनी परिसरात घडली़ संशयित अकिल गुलाब मनियार असे अत्याचार करणाऱ्या संशयिताचे नाव असून, सातपूर पोलिसांनी त्यास अटक केली आहे़

Sexual abuse at the age of eight years | आठवर्षीय बालकावर लैंगिक अत्याचार

आठवर्षीय बालकावर लैंगिक अत्याचार

ठळक मुद्दे खेळणी व खाऊचे आमिषपोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल

नाशिक : खेळणी व खाऊचे आमिष दाखवून आठ वर्षाच्या चिमुरड्यावर ३८ वर्षीय इसमाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना रविवारी (दि़७) सकाळी सातपूर कॉलनी परिसरात घडली़ संशयित अकिल गुलाब मनियार असे अत्याचार करणाऱ्या संशयिताचे नाव असून, सातपूर पोलिसांनी त्यास अटक केली आहे़

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सातपूर कॉलनीतील एका गल्लीत खेळत असलेल्या आठ वर्षीय चिमुरड्यास संशयित मनियार याने खेळणी तसेच खाऊ देण्याचे आमिष दाखवून त्यास एका इमारतीच्या गच्चीवर घेऊन गेला़ या ठिकाणी चिमुरड्यावर लैंगिक अत्याचार केला, यानंतर या मुलाने रडत-रडत घरी जाऊन हा प्रकार सांगितला़

या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित मनियारला अटक केली आहे़

Web Title: Sexual abuse at the age of eight years