१ जानेवारी पासून मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 15:42 IST2020-12-11T15:38:07+5:302020-12-11T15:42:23+5:30

नाशिक- मालेगाव महापालिकेने कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोग लागू करण्याची घोषणा केली, मग नाशिक महापालिका त्या तुलनेत मोठी आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम असूनही अंमलबजावणी का करीत नाही असा प्रश्न करीत स्थायी समिती सभापती गणेश गिते यांनी येत्या १ जानेवारीपासून कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागु करण्याचे आदेश दिले आहेत.

Seventh pay for corporation employees from January 1! | १ जानेवारी पासून मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन !

१ जानेवारी पासून मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन !

ठळक मुद्देसभापती गीते यांचे आदेश  प्रशासनाच्या वेळकाढू धेारणाबद्दल नाराजी

नाशिक- मालेगाव महापालिकेने कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोग लागू करण्याची घोषणा केली, मग नाशिक महापालिका त्या तुलनेत मोठी आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम असूनही अंमलबजावणी का करीत नाही असा प्रश्न करीत स्थायी समिती सभापती गणेश गिते यांनी येत्या १ जानेवारीपासून कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागु करण्याचे आदेश दिले आहेत.

 महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक सभापती गणेश गिते यांच्य अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि.११) पार पडली. यावेळी त्यांनी हे निर्देश दिले आहेत. राज्य शासन समकक्ष वेतनश्रेणी लागु करण्यावरून महापालिकेत गेांधळ सुरू असला तरी गेल्याच महिन्यात झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत दोन दिवसात शासनाकडे आदेश पाठवण्यास सांगण्यात आले होते. मात्र त्यानंतरही प्रशासनाची कार्यवाही संथ असून पदोन्नतीचे काम देखील रखडले आहेत. याबाबत शिवसेनेचे सुधाकर बडगुजर यांनी प्रशासन उपआयुक्त मनोज घेाडे पाटील यांच्या कार्यपध्दतीविषयी नाराजी व्यक्त केली, सध्याच्या सेवा ज्येष्ठतेयादीमुळे ३१ डिसेंबरच्या आत पदाेन्नतीबाबत निर्णय हेाणे अपेक्षीत आहे. नाही तर पुन्हा त्यात विलंब हेाईल असे त्यांनी सांगितले.  तर काँग्रेस पक्षाचे राहूल दिवे यांनी पदोन्नती नाकारून मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप केला. 

सभापती गणेश गिते यांनी या प्रकरणी प्रशासनाच्या गतीबाबत नाराजी व्यक्त केली परंतु कर्मचाऱ्यांना येत्या १ जानेवारी पासून सातवा वेतन आयोग लागु करण्याचे आदेश देण्याचे आदेश दिले आहेत. पदोन्नतीबाबत देखील तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश त्यांनी दिलेत. 

Web Title: Seventh pay for corporation employees from January 1!