ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 10 - मित्राच्या घरात एका अल्पवयीन मुलीला डांबून जीवे ठार मारण्याचा धाक दाखवून बलात्क ार केल्याप्रकरणी एका नराधमाला जिल्हा व सत्र न्यायालयाने सात वर्षे सक्तमजूरीची शिक्षा सोमवारी (दि.९) सूनावली असून साथीदार मित्रालाही तुरूंगवासाची शिक्षा दिली आहे.

नराधम नितीन देवराम कडाळे याने रस्त्याने पायी जाणाºया एका अल्पवयीन मुलीला फूस लावून कांतीलाल गणपत पारधीच्या घरात नेले. मुलीला जीवे मारण्याची धमकी देत कडाळे याने डांबून ठेवले तर पारधीने दरवाजाला बाहेरुन कडी लावून घेतली. दरम्यान, कडाळे याने मुलीवर बलात्कार केल्याची घटना १ सप्टेंबर २०१५ साली हरसूल जवळील लाडची पाड्यालगत घडल्याचे उघडकीस आले होते. या घटनेनंतर पीडित मुलीवर तीन दिवस हरसुललच ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यानंतर सहा सप्टेंबरला दोघांविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी नराधमासह त्याच्या साथीदाराच्याही मुसक्या आवळल्या होत्या. सहायक पोलीस निरीक्षक पी. पी. साळुंखे यांनी तपास करून आरोपींविरोधात सबळ पुरावे संकलित करुन न्यायालयापुढे सादर केले. त्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एच. मोरे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. सरकारी पक्षाच्या वतीने अॅड. गायत्री पटनाला यांनी या खटल्यात एकूण नऊ साक्षीदार तपासले. त्यानुसार न्यायालयाने आरोपी कडाळे यास सात वर्षे सक्तमजूरीची शिक्षा ठोठावली असून पारधी यास बलात्कार प्रकरणी कडाळेला मदत केल्याप्रकरणी दोषी धरले आहे. पारधी अटकेनंतर कारागृहातच असल्याने त्याची शिक्षा पुर्ण झाल्याचे माणण्यात आले आहे.