सातपूरच्या युवकाकडून गावठी कट्टा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 17:23 IST2018-11-20T17:22:50+5:302018-11-20T17:23:29+5:30

नाशिक : सातपूर महिंद्रा कंपनीच्या पार्किंगसमोर उभ्या असलेल्या युवकाकडून शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनने सोमवारी (दि़१९) रात्रीच्या सुमारास गावठी कट्टा जप्त केला़ योगेश चिंतामण सोनवणे (२८, रा़ महालक्ष्मी चौक, प्रबुद्धनगर, सातपूर) असे कट्टा जप्त करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे़

 Seven Katta seized from the youth of Satpur | सातपूरच्या युवकाकडून गावठी कट्टा जप्त

सातपूरच्या युवकाकडून गावठी कट्टा जप्त

ठळक मुद्देभारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल

नाशिक : सातपूर महिंद्रा कंपनीच्या पार्किंगसमोर उभ्या असलेल्या युवकाकडून शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनने सोमवारी (दि़१९) रात्रीच्या सुमारास गावठी कट्टा जप्त केला़ योगेश चिंतामण सोनवणे (२८, रा़ महालक्ष्मी चौक, प्रबुद्धनगर, सातपूर) असे कट्टा जप्त करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे़

गुन्हे शाखेचे पोलीस शिपाई योगेश सानप यांना सोनवणेकडे गावठी कट्टा असल्याची माहिती मिळाली होती़ त्यानुसार रात्री नऊ वाजेच्या सुमारास महिंद्रा कंपनीच्या पार्किंगसमोरील पोलिसांनी सापळा लावून त्यास ताब्यात घेतले़ त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे २० हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल आढळून आले़

या प्रकरणी संशयित सोनवणे याच्या विरोधात सातपूर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title:  Seven Katta seized from the youth of Satpur