जुगार खेळणाऱ्या सात जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 18:41 IST2019-08-02T18:38:29+5:302019-08-02T18:41:55+5:30
कळवण शहरातील गावठाण परिसरात असलेल्या मारु ती मंदिराच्या पाठीमागे जुगार खेळणार्या सात जणांना कळवण पोलिसांनी छापा टाकून अटक केली आहे.

जुगार खेळणाऱ्या सात जणांना अटक
कळवण : कळवण शहरातील गावठाण परिसरात असलेल्या मारु ती मंदिराच्या पाठीमागे जुगार खेळणार्या सात जणांना कळवण पोलिसांनी छापा टाकून अटक केली आहे. त्यांच्या जवळून जुगाराचे साहित्य व ३३ हजार ५०० रु पये मिळून आले आहे. त्यांच्या विरोधात कळवण पोलीस ठाण्यात मुंबई जुगार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील गावठाण परिसरात असलेल्या मारु ती मंदिराच्या पाठीमागे अवैध जुगार सुरु असल्याची माहिती कळवण पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून जुगार खेळणाºया प्रकाश हरिश्चंद्र कुमावत, तपन जगन्नाथ धिवरे, नाना देविदास मोहिते, मदन तुकाराम कुमावत, कन्हैयालाल मोतीलाल कुमावत, युवराज देवचंद कुमावत, राकेश देविदास मोहिते या सात जणांना जुगाराचे साहित्य व ३३ हजार ५०० रु पयांसह अटक केली आहे. त्यांच्या विरोधात कळवण पोलीस ठाण्यात मुंबई जुगार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार ए डी निकम करीत आहे.
कळवण शहरात अवैध गुटखा
विक्र ी व अमली पदार्थांचीही (गांजा, अफू ) विक्र ी सर्रास सुरु आहे. या नशेखोर नागरिकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. या विरोधातही कळवण पोलिसांनी कारवाईची धडक मोहीम सुरु करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.