सहा लाखांची रोकड घेऊन नोकर फरार

By Admin | Updated: January 20, 2016 22:08 IST2016-01-20T22:02:48+5:302016-01-20T22:08:48+5:30

सहा लाखांची रोकड घेऊन नोकर फरार

The servants absconded with cash of six lakhs | सहा लाखांची रोकड घेऊन नोकर फरार

सहा लाखांची रोकड घेऊन नोकर फरार

मालेगाव : येथील मोसम पूल चौकातील पेट्रोलपंपावर पोहोचविण्यासाठी दिलेली सहा लाख रुपयांची रोकड व दुचाकी घेऊन फरार झालेल्या नोकराविरुद्ध तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. २७ डिसेंबर २०१५ रोजी दुपारी ३ वाजता ही घटना घडली. मंगळवारी सायंकाळी मोहनीश सुरेश पवार (२८), रा. सटाणा नाका यांनी फिर्याद दिली. प्रियभरत प्रफुल्लकुमार रौत, रा. भिलाई, जि. दुर्ग हा पवार यांच्याकडे कामाला होता. पवार यांनी वऱ्हाणे शिवारातील त्यांच्या कंपनी कार्यालयातून सहा लाख रुपयांची रक्कम मोसम पूल चौकातील पेट्रोलपंपावर पोहोच करण्यासाठी त्याच्याकडे दिली होती. सोबत दुचाकी (क्र. एमएच १५ सीए ०२२१) ही दिली होती. रकमेसह दुचाकी घेऊन तो फरार झाला. अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत.
जातीवाचक शिवीगाळ
मालेगाव : तालुक्यातील सोनज येथे विवाहितेच्या पतीला फोन करून तिची बदनामी करणाऱ्या तरुणासह सात जणांविरोधात जातीवाचक शिवीगाळ केली म्हणून तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. १५ एप्रिल २०१५ पासून आजपर्यंत हा प्रकार चालू होता. पीडित विवाहित महिलेने फिर्यादीत म्हटले आहे की, समाधान अर्जुन धोंगडे याने तिच्या पतीला फोन करून तिची बदनामी केली. तसेच अर्जुन रामभाऊ धोंगडे, शिवाजी धोंगडे, निंबा धोंगडे, शोभाबाई धोंगडे, साहेबराव धोंगडे, समाधान धोंगडे यांनी सदर वावाहित महिलेच्या आई-वडिलांच्या घरी जाऊन त्यांना जातीवाचक शिवीगाळ व दमदाटी केली. अधिक तपास पोलीस उपअधीक्षक अशोक नखाते करीत आहेत.
महिलांकडून दागिने लंपास
नाशिक : वडाळानाका ते शालिमार यादरम्यान रिक्षामधून प्रवास करत असताना एका महिलेच्या पर्समधील सुमारे ९४ हजार पाचशे रुपयांचे ६३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने दोन अज्ञात सहप्रवासी महिलांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रज्ञा राजेंद्र नंदवालकर (वय २१, रा.गांधीनगर, नंदुरबार) या रिक्षामधून सीबीएस बसस्थानकाकडे जात असताना वडाळानाका ते शालिमार यादरम्यान, दोन अज्ञात महिला सहप्रवासी रिक्षात बसल्या. त्यांनी प्रज्ञा यांच्या पर्समध्ये ठेवलेले ६३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने मोठ्या चलाखीने लंपास केले. याप्रकरणी प्रज्ञा यांच्या फिर्यादीवरून भद्रकाली पोलीस ठाण्यात अज्ञात महिलांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The servants absconded with cash of six lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.