दिंडोरीत द्राक्ष उत्पादकांच्या फसवणुकीची मालीका सुरु च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 11:21 PM2020-09-17T23:21:15+5:302020-09-17T23:21:53+5:30

वणी : दिंडोरी तालुक्यात द्राक्ष उत्पादकांच्या फसवणुकीची मालीका सुरु चअसुन सातत्याने याबाबत गुन्हे दाखल होत आहेत. आंबे दिंडोरी येथील योगेश पुंडलीक गायकवाड यांचे द्राक्ष बागेतुन दिनानाथ गुप्ता, अमित गुप्ता, सुमित गुप्ता सर्व राहणार यमुना हाईट्स महालक्ष्मी नगर, हिरावाडी, पंचवटी नाशिक यांनी ३२ रु पये किलो प्रमाणे १५०० क्विंटल द्राक्षे मार्च महीन्यात खरेदी केली. त्यापैकी काही रक्कम दिली, मात्र त्या व्यवहारातील ४ लाख ७१ हजार रु पयांची रक्कम न देता त्या रकमेचा धनादेश दिला.

A series of frauds against grape growers has started in Dindori | दिंडोरीत द्राक्ष उत्पादकांच्या फसवणुकीची मालीका सुरु च

दिंडोरीत द्राक्ष उत्पादकांच्या फसवणुकीची मालीका सुरु च

Next
ठळक मुद्देव्यवहारातील ४ लाख ७१ हजार रु पयांची रक्कम न देता त्या रकमेचा धनादेश दिला.

वणी : दिंडोरी तालुक्यात द्राक्ष उत्पादकांच्या फसवणुकीची मालीका सुरु चअसुन सातत्याने याबाबत गुन्हे दाखल होत आहेत.
आंबे दिंडोरी येथील योगेश पुंडलीक गायकवाड यांचे द्राक्ष बागेतुन दिनानाथ गुप्ता, अमित गुप्ता, सुमित गुप्ता सर्व राहणार यमुना हाईट्स महालक्ष्मी नगर, हिरावाडी, पंचवटी नाशिक यांनी ३२ रु पये किलो प्रमाणे १५०० क्विंटल द्राक्षे मार्च महीन्यात खरेदी केली. त्यापैकी काही रक्कम दिली, मात्र त्या व्यवहारातील ४ लाख ७१ हजार रु पयांची रक्कम न देता त्या रकमेचा धनादेश दिला.
सदर धनादेश वटला नाही. वारंवार पैशाची मागणी करु नही पैसे मिळाले नाहीत. सदर शेतकर्याचा विश्वास संपादन करु न फसवणुक केल्याची तक्र ार नमुद तिघांविरोधात दाखल झाल्याने दिंडोरी पोलीस ठाण्यात ठकबाजीचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन यापुर्वीही या संशयितांवर अशाच पद्धतीचे गुन्हे दाखल करण्यातआलेले आहेत.

Web Title: A series of frauds against grape growers has started in Dindori

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.