स्वेच्छानिवृत्तीनंतर बीएसएनएल कर्मचाऱ्यांची निस्वार्थ सेवा; मोबदल्याशिवाय नियमित कामकाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 16:17 IST2020-02-08T16:03:14+5:302020-02-08T16:17:31+5:30
बीएसएनएलच्या नाशिक विभागात कार्यरत ९२० पैकी ७५ टक्के म्हणजे जवळपास ६७४ कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्विकारली असून हे सर्व कर्मचारी ३१ जानेवारी २०१० पासून कार्यमुक्त झाले आहेत. परंतु, बीएसएनलच्या सेवा मनुष्यबळाअभावी अचानक कोलमडू नये यासाठी स्वेच्छानिवृत्तीनंतरही अनेक कर्मचारी आजही निस्वार्थपणे आवश्यकतेनुसार त्यांची जाबाबदारी कोणताही मोबदला घेता सांभाळत आहेत.

स्वेच्छानिवृत्तीनंतर बीएसएनएल कर्मचाऱ्यांची निस्वार्थ सेवा; मोबदल्याशिवाय नियमित कामकाज
नाशिक : भारतीय दूरसंचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) च्या नाशिक विभागात कार्यरत ९२० पैकी ७५ टक्के म्हणजे जवळपास ६७४ कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्विकारली असून हे सर्व कर्मचारी ३१ जानेवारी २०१० पासून कार्यमुक्त झाले आहेत. परंतु, बीएसएनलच्या सेवा मनुष्यबळाअभावी अचानक कोलमडू नये यासाठी स्वेच्छानिवृत्तीनंतरही अनेक कर्मचारी आजही निस्वार्थपणे आवश्यकतेनुसार त्यांची जाबाबदारी कोणताही मोबदला घेता सांभाळत आहेत.
बीएसएनएलमधून ७५ टक्के कर्मचाऱ्यांनी सेवानिवृत्ती घेतल्यानंतर सेवांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत होती. मात्र नाशिकमधील बीएसएनएलच्या ९२० पैकी ६७४ कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्विकारल्यानंतरही ते आवश्यकतेनुसार त्यांच्या कामाची जबाबदारी पूर्वीप्रमाणेच कोणत्याही मोबदल्याशिवाय सांभाळत आहेत. त्यामुळे बीएसएनलच्या सेवा पूर्वीप्रमाणेच सुरळीत सुरू आहेत. बीएलएनल नाशिकचे महाप्रबंधक नितीन महाजन यांनी स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्या कर्मचाऱ्याना सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला स्वेच्छा निवृत्ती पत्करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद देत ३१ जानेवारीनंतर कार्यालयीन कामकाजासोबत तांत्रिक व पायाभूत सोयीसुविधांशी निगडीत सर्व सेवा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी आवश्यक्तनुसार योगदान देण्याची भूमिक घेतल्याने नाशिकमध्ये बीएसएनएल सेवा सुरळीत सुरू आहेत. देशाच्या काही भागात स्वेच्छानिवृत्तीचा बीएसएनएल सेवेला फटका बसत असला तरी नाशिक त्यात अपवाद ठरले असून स्थानिक व्यवस्थापनाने आणि स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्या कर्मचाऱ्यांनी परीस्थिती आत्मियतेने हाताळल्याने नाशिकमधील सेवा सुरळीच सुरू आहे. यापुढे सेवा सुरळीत सुरू राहण्यासाठी बीएसएनला नाशिकमध्ये शंभर ते दीडशे कर्मचाऱ्यां ची गरजभासणार असून आवश्यकतेनुसार कंत्राटी पद्धतीने हे मनुष्यबळ उपलब्ध करण्यात येणार असल्याचे नितिन महाजन यांनी सांगितले.