सिडकोत चार गाळे मनपाकडून सील

By Admin | Updated: March 2, 2016 00:17 IST2016-03-02T00:11:45+5:302016-03-02T00:17:33+5:30

सिडकोत चार गाळे मनपाकडून सील

Seedkot seals four blocks from Municipal Corporation | सिडकोत चार गाळे मनपाकडून सील

सिडकोत चार गाळे मनपाकडून सील

 सिडको : महापालिकेने घरपट्टी थकबाकीदारांविरोधी जप्तीची मोहीम सुरू केली असून, मंगळवारी सिडको विभागातील चार थकबाकीदारांचे गाळे सील करण्यात आले. दोन दिवसांपूर्वीच मनपाने पाच थकबाकीदारांच्या मिळकती सील केल्या होत्या.
महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने दोन दिवसांपासून थकबाकीदारांविरोधी मोहीम हाती घेण्यात आली आहे. ज्या थकबाकीदारांकडे २० ते २५ हजार रुपयांपेक्षा जास्त थकबाकी आहे अशा थकबाकीदारांविरोधी कारवाई सुरू आहे. शनिवारी (दि.२६ फेबु्रवारी) मनपाने अंबड, कामटवाडे, खुटवडनगर भागातील पाच थकबाकीदारांच्या मिळकती जप्त केल्या होत्या. त्यानंतर मंगळवारी राणेनगर, गणेशचौक, पेलिकन पार्क या भागांतील चार थकबाकीदारांचे व्यावसायिक गाळे सील करण्यात आले. महापालिकेचे उपआयुक्त रोहिदास दोरकुळकर, विभागीय अधिकारी आर. आर. गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पी. पी. रोटे, एस. एम. खरे, एस. एन. माळी, भगवान गांगुर्डे, किरते आदिंनी कारवाई केली. (वार्ताहर)

Web Title: Seedkot seals four blocks from Municipal Corporation