२३ गावांची सुरक्षा केवळ ४३ पोलिसांच्या हाती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 00:21 IST2018-11-17T22:32:08+5:302018-11-18T00:21:13+5:30
एकीकडे तक्रारींचे निराकरणासाठी पारदर्शक कारभार, नव्या योजना, नवे रूप ही संकल्पना दृष्टिक्षेपात ठेवत आयएसओ मानांकित होण्याच्या दिशेने वाटचाल करत असलेल्या येथील पोलीस ठाणे परिसरात तक्रारदारांची मात्र नेहमीच रेलचेल असते. मात्र, दुसरीकडे पोलीस ठाण्यात गेल्या ५० वर्षांपासून अपुऱ्या बळामुळे पंचक्रोशीतील २३ गावांची सुरक्षा अवघे ४३ पोलीस कर्मचारी पाहत आहेत.

पोलीस कर्मचारीच उपलब्ध नसल्याने शहरातील चौकात होणारी वाहतूक कोंडी नित्याचीच बनली आहे.
पिंपळगाव बसवंत : एकीकडे तक्रारींचे निराकरणासाठी पारदर्शक कारभार, नव्या योजना, नवे रूप ही संकल्पना दृष्टिक्षेपात ठेवत आयएसओ मानांकित होण्याच्या दिशेने वाटचाल करत असलेल्या येथील पोलीस ठाणे परिसरात तक्रारदारांची मात्र नेहमीच रेलचेल असते. मात्र, दुसरीकडे पोलीस ठाण्यात गेल्या ५० वर्षांपासून अपुऱ्या बळामुळे पंचक्रोशीतील २३ गावांची सुरक्षा अवघे ४३ पोलीस कर्मचारी पाहत आहेत.
पिंपळगाव पोलीस ठाण्यात १९७०पासून मंजूर असलेल्या ५५ पोलीस कर्मचाºयांच्या अद्याप नियुक्त्या झालेल्या नाहीत. कर्मचाºयांच्या साप्ताहिक सुट्या व रजा यामुळे प्रत्यक्षात २५ ते ३० कर्मचारीच कामावर हजर असतात. कर्मचारी संख्या कमी असल्याने अनेक कर्मचाºयांना आठ तासापेक्षा जास्त वेळ ड्यूटी बजवावी लागते. सद्यस्थितीत अवघे ४३ पोलीस कर्मचारी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यात चार पोलीस अधिकारी, ३१ पुरु ष पोलीस कर्मचारी व ८ महिला पोलीस आहेत. पिंपळगाव बसवंत शहर व परिसरातील २३ गावांची लोकसंख्या जवळपास पाच लाखांच्या आसपास आहे. परिसरात वाढती गुन्हेगारी, अवैध धंदे रोखण्यासाठी पोलीस कर्मचाºयांची मोठी दमछाक होताना दिसून येते. वाढत्या कामामुळे कर्मचाºयांवर मानसिक ताणही पडत आहे.
पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिरवाडे, रेडगाव, सावरगाव, रानवड, वावी, ठुशी, गोरठाण, नांदूर, पालखेड मिरची, दावचवाडी, लोणवाडी, कारसूळ, नारायण टेंभी, कुंभारी, आहेरगाव, उंबरखेड, मुखेड, अंतरवेली, पाचोरे वणी, बेहेड, साकोरे, शिरसगाव, कोकणगाव, वडाळीनजीक या २३ गावांचा समावेश होतो. २३ गावांची सुरक्षा बघता पोलीस ठाण्यात पुरेशी कर्मचारीसंख्या नसल्याने नागरिकांची सुरक्षा धोक्यात आहे. शहरातील चिंचखेड चौफुली परिसरात मोठी वाहतूक कोंडी होते. परंतु स्थानकात कर्मचारीसंख्या कमी असल्याने पोलीस नेमके कुठे बंदोबस्ताला पाठवायचे हा प्रश्न वरिष्ठ अधिकाºयांना पडतो. त्याचबरोबर पोलीस ठाण्यासाठी एकच वाहन असून, तेसुद्धा धक्कास्टार्ट आहे. त्यामुळे बºयाचदा पोलीसांना घटनास्थळी पोहोचण्यास उशीर होतो.