बांधकाम पूर्ण न झालेल्या सभागृहालाही सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 00:13 IST2019-05-11T00:12:42+5:302019-05-11T00:13:12+5:30
महापालिकेने नियमभंग करून चालविलेल्या जाणाऱ्या आपल्याच मिळकतींवरील कारवाई सुरूच ठेवली आहे; परंतु त्यापलीकडे जाऊन पंचवटीत ज्या सभागृहाचे बांधकाम पूर्ण झाले नाही की, लोकार्पण झाले नाही अशा अर्धवट स्थितीतील मिळकती सील केल्याचा प्रकार शुक्रवारी (दि. १०) घडला. याप्रकरणी नागरिकांबरोबरच सत्तारूढ भाजपाच्या नगरसेवकानेच संताप व्यक्त केला आहे.

बांधकाम पूर्ण न झालेल्या सभागृहालाही सील
नाशिक : महापालिकेने नियमभंग करून चालविलेल्या जाणाऱ्या आपल्याच मिळकतींवरील कारवाई सुरूच ठेवली आहे; परंतु त्यापलीकडे जाऊन पंचवटीत ज्या सभागृहाचे बांधकाम पूर्ण झाले नाही की, लोकार्पण झाले नाही अशा अर्धवट स्थितीतील मिळकती सील केल्याचा प्रकार शुक्रवारी (दि. १०) घडला. याप्रकरणी नागरिकांबरोबरच सत्तारूढ भाजपाच्या नगरसेवकानेच संताप व्यक्त केला आहे.
पंचवटीत दिंडोरी रोडवरील महालक्ष्मी चित्रपटगृहाच्या पाठीमागील बाजूस श्रीरामनगर आहे. याठिकाणी एक सभागृह हे माजी आमदार (कै.) डॉ. दौलतराव आहेर यांच्या आमदार निधीतून झाले आहे. दुसºया सभागृहाचे सध्या बांधकाम सुरू आहे. अत्यंत नवीन बांधकाम असलेल्या या इमारतीत नुकतीच रंगरंगोटी सुरू असून, विद्युतीकरण झालेले नाही. इमारत अपूर्ण असल्याने ती कोणत्याही संस्थेला कराराने चालविण्यास दिलेली नाही. किंबहुना इमारतीचे लोकार्पणच झालेले नाही; मात्र महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कोणताही मागचा पुढचा विचार न करताच हे निर्माणाधीन असलेल्या इमारतीला सील केले आहे.
महापालिकेच्या या प्रकाराविषयी नगरसेवक जगदीश पाटील यांनी संताप व्यक्त करून महापालिकेला आता डोके ठिकाणावर आहे काय? असा प्रश्न करण्याची वेळ आली असल्याचे सांगितले. मुळात महापालिकेच्या मालकीचे हे सभागृह असून, त्याचे बांधकाम अपूर्ण आहे. त्यामुळे सभागृहाचे उद्घाटन झालेले नाही की कोणत्याही राजकीय मंडळाला देण्याचा ठराव मंजूर झालेला नाही. अशा स्थितीत अशी कारवाई करणे म्हणजे निव्वळ वेडेपणाच आहे. यासंदर्भात प्रशासनाला जाब विचारण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
स्वामी समर्थ केंद्राला सील कायम
मनपातर्फेअल्पदरात चालवायला दिलेल्या मिळकतींवर कारवाई सुरू आहे. याच मोहिमेंतर्गत बुधवारी मोगलनगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्राला सील लावल्याने सेवेकºयांमध्ये नाराजी पसरली आहे. दरम्यान, श्री स्वामी समर्थ केंद्राला लावलेले सील काढावे यासाठी सेवेकºयांनी मनपा अधिकारी यांना भेटून सील काढण्याची मागणी केली. तरी मनपाने श्री स्वामी समर्थ केंद्राचे सील काढले नसल्याने सेवेकºयांमध्ये नाराजी पसरली आहे.