शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
2
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
3
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
4
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
5
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
6
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान
8
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
9
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
10
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
11
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
12
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
13
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
14
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
15
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
16
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
17
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
18
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
19
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
20
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

धक्कादायक : 'तुमची कटकटच मिटवितो...' असे म्हणत कोयत्याने तृतीयपंथीयाचा हात मनगटातून कापला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 5:47 PM

महिलेची मैत्रिण असलेली तृतीयपंथीयाने तिला वाचविण्यासाठी धाव घेतली असता संशयिताने तृतीयपंथीयाच्या हातावर कोयत्याने वार केला. यामध्ये मनगटापासून तिचा डाव्या हाताचा पंजा कापला गेला.

ठळक मुद्देबळजबरीने घरात शिरुन कोयत्याने केले वारप्रेमसंबंधाच्या संशयातून हल्ला

नाशिक : घरी येऊन भांडण का केले याचा जाब विचारला म्हणून राग आल्याने बळजबरीने घरात प्रवेश करत एका महिलेसह तृतीयपंथीयावर कोयत्याने सपासप वार करून तृतीयपंथीयाचा डावा हात मनगटापासून कापल्याची धक्कादायक घटना पंचवटीच्या फुलेनगर भागात घडली. याप्रकरणी पोलिसांनी संशयित कोयताधारी हल्लेखोर हेमंत बाबुराव बागुल (२६,रा.वैशालीनगर) यास अटक केली आहे.पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतील वैशालीनगर भागात राहणाऱ्या फिर्यादी पिडित महिलेच्या घरी संशयित बागुल पाठीला कोयता लावून सोमवारी (दि.१०) मध्यरात्री आला. यावेळी त्याने जुन्या भांडणाची कुरापत काढून फिर्यादी महिलेसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी महिलेने त्यास भांडण का केले? असा जाब विचारला असता संशयिताने पाठीला लावलेला कोयता काढून तीच्या अंगावर वार केला. यावेळी महिलेची मैत्रिण असलेली तृतीयपंथीयाने तिला वाचविण्यासाठी धाव घेतली असता संशयिताने तृतीयपंथीयाच्या हातावर कोयत्याने वार केला. यामध्ये मनगटापासून तिचा डाव्या हाताचा पंजा कापला गेला. या धक्कादायक घटनेनंतर संशयिताने महिलेच्याही अंगावर वार करुन तीलाही जखमी करत घरातून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांच्यासह वरिष्ठ पोलीस निरिक्षक अशोक भगत, सहायक निरिक्षक एस.जी.डंबाळे या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. दोघा जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. याप्रकरणी फिर्यादी पिडित २२वर्षीय युवतीच्या तक्रारीवरुन पंचवटी पोलिसांनी संशयित कोयताधारी बागुल यास अटक केलीे असून त्याच्याविरुध्द खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.प्रेमसंबंधाच्या संशयातून हल्लाफिर्यादी पिडित युवतीसोबत तृतीयपंथीयाचे प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरुन संशयित बागुल हा वारंवार फिर्यादी महिलेच्या घरी जाऊन वाद घालत होता. या वादाचे पर्यावसन सोमवारी मध्यरात्री हाणामारीत झाले. यावेळी संशयित बागुल याने 'तुमची कटकटच मिटवितो...' असे म्हणत कोयत्याने हल्ला चढविला. या हल्ल्याच तृतीयपंथीयाचा डावा पंजा तुटला तसेच डोक्यावरही कोयता मारल्याने गंभीर दुखापत झाली. तर महिलेच्या डाव्या पायावर वार करुन गंभीररित्या जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयPoliceपोलिसArrestअटक