शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
2
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
3
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
4
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
5
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
6
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
7
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
8
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
9
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
10
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
11
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
12
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...
13
४०% पार्ट्स होणार स्वस्त! सर्व्हिसिंगच्या बिलातही दिलासा; GST कपातीनंतर सोपा होणार कार-बाईकचा मेंटेनन्स
14
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
15
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
16
शुक्र गोचर २०२५: शुक्रादित्य राजयोग; 'या' ६ राशी हात लावतील तिथे सोनं करतील!
17
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
18
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
19
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
20
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...

मूर्तिकाराकडे हवी जिद्द अन् चिकाटी...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 17:48 IST

सर्वांच्या लाडक्या ‘गणपती बाप्पा’चे आगमन काही दिवसांवर येऊन ठेपल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सध्या पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे अनेकांचा कल वाढत आहे. साहजिकच ‘प्लॅस्टर आॅफ पॅरिस’च्या मूर्तींऐवजी शाडूमातीच्या श्री गणेशाच्या मूर्ती स्थापन करण्याचा प्रयत्न भाविक करतात. परंतु शाडूमातीच्या मूर्ती घडविण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागते. गेल्या तीन पिढ्यांपासून शाडूमातीच्या मूर्ती बनविण्याचा व्यवसाय करणारे मूर्तिकार लोंढे कुटुंबीय नाशकात प्रसिद्ध आहे. केवळ मूर्तीकलाच नव्हे तर धातुकला, शिल्पकला यात देशभरात नावलौकिक मिळविलेले शिल्पकार संदीप लोंढे यांच्याशी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर साधलेला संवाद..

ठळक मुद्देजिद्द आणि चिकाटी तरच तुम्ही यशस्वी होऊ शकता.

मुकुंद बाविस्कर सर्वांच्या लाडक्या ‘गणपती बाप्पा’चे आगमन काही दिवसांवर येऊन ठेपल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सध्या पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे अनेकांचा कल वाढत आहे. साहजिकच ‘प्लॅस्टर आॅफ पॅरिस’च्या मूर्तींऐवजी शाडूमातीच्या श्री गणेशाच्या मूर्ती स्थापन करण्याचा प्रयत्न भाविक करतात. परंतु शाडूमातीच्या मूर्ती घडविण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागते. गेल्या तीन पिढ्यांपासून शाडूमातीच्या मूर्ती बनविण्याचा व्यवसाय करणारे मूर्तिकार लोंढे कुटुंबीय नाशकात प्रसिद्ध आहे. केवळ मूर्तीकलाच नव्हे तर धातुकला, शिल्पकला यात देशभरात नावलौकिक मिळविलेले शिल्पकार संदीप लोंढे यांच्याशी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर साधलेला संवाद..

 मूर्तिकला आणि शिल्पकला या क्षेत्राकडे आपण कसे वळालात?- नाशिक शहराला धातुकला, चित्रकला, मूर्तिकला आणि शिल्पकलेचा मोठा वारसा लाभलेला आहे. आमच्या लोंढे घराण्यालादेखील मूर्तिकला आणि शिल्पकलेचा असाच वारसा लाभलेला आहे. आमचे आजोबा सीताराम विठ्ठल लोंढे हे कर्मवीर दादासाहेब फाळके यांच्या फिल्म कंपनीसाठी या कलेचे काम करत. त्यानंतर माझे वडील कृष्णाजी लोंढे आणि काका सुधाकर लोंढे यांनी कलेचा हा वारसा जोपासला. त्यामुळे रोजच या कलेचे दर्शन होत असे. त्यातील बारकाव्यांचा कळत-नकळत अभ्यास करत गेलो. त्यातून आपोआपच या कलेकडे वळालो. एकेकाळी गणेशोत्सवातील श्रींच्या मूर्ती आणि देखावे हे वैशिष्ट्यपूर्ण मानले जात असत. या उत्सवात असे नेमके काय वेगळेपण आहे?- साधारणत: १९७० ते १९९० या काळात नाशिकमधील गणेशोत्सव हा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने साजरा होत असे. गणेशोत्सवात कोणती आरास करावयाची याबाबत गुप्त खलबते होत असत. मग मूर्तिकारांना आधीच कशा प्रकारची मूर्ती घडवायची याची संकल्पना सांगण्यात येई तर काही वेळा स्वत: मूर्तिकारालाच वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती बनविण्याचे अधिकार सार्वजनिक मंडळांकडून दिले जात. त्यातून रात्रंदिवस मेहनत करून आगळीवेगळी संकल्पना घेऊन मूर्तिकार मूर्ती घडवित असत.मूर्तिकला आणि शिल्पकला या क्षेत्रात कालानुरूप कसे बदल होत गेले?- पारंपरिकता आणि आधुनिकता या दोन्ही प्रकाराने ही कला साधता येते तर कधी दोन प्रकारांचा संगम करून नवनिर्मिती घडवावी लागते. गणेशोत्सवाचे स्वरूपदेखील बदलत चालले आहे. पूर्वी वेगवेगळ्या ऐतिहासिक, पौराणिक देखाव्यांना खूप महत्त्व होते. आता आकर्षक विद्युत रोषणाईवर भर दिला जातो. आम्ही फक्त शाडूमातीच्या मूर्ती बनवितो. शाडूमातीच्या मूर्तीकडे लोक पुन्हा वळू लागले आहेत. प्रत्येकालाचा अशी मूर्ती बनविता आली आणि त्यांनी आपापल्या घरी या मूर्तीची स्थापना केली तर एक वेगळेच समाधान मिळेल. दोन दशकांचा शिल्पकलेचा प्रवास कसा होता?- शिल्पकला ही खूप अवघड कला आहे. देशभरात आम्ही अनेक शिल्पे व पुतळे उभारली आहेत. या क्षेत्रात काम करताना राज्य शासनाचा कला पुरस्कार मिळाला. या क्षेत्रात कष्ट, मेहनत खूप आहे. पूर्वी नाशिकला एकच चित्रकला महाविद्यालय होते. आता चार-पाच महाविद्यालये झाली आहे. कलाक्षेत्राकडे युवकांचा कल वाढतो आहे. कोणत्याही क्षेत्रात काम करणे अवघड नाही. परंतु त्यासाठी असावी लागते आवड; परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाचे आहे जिद्द आणि चिकाटी तरच तुम्ही यशस्वी होऊ शकता.