शाळा समाजपरिवर्तनाचे केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:14 IST2021-09-25T04:14:23+5:302021-09-25T04:14:23+5:30

नाशिक : समाजाला परिवर्तनाची दिशा देण्याचे काम शिक्षण संस्था, शाळा व शालेय घटक करतात. याकामी नाशिक एज्युकेशन सोसायटीने ९९ ...

School Social Transformation Center | शाळा समाजपरिवर्तनाचे केंद्र

शाळा समाजपरिवर्तनाचे केंद्र

नाशिक : समाजाला परिवर्तनाची दिशा देण्याचे काम शिक्षण संस्था, शाळा व शालेय घटक करतात. याकामी नाशिक एज्युकेशन सोसायटीने ९९ वर्षांत विविध उपक्रम राबविले आहेत. त्यामुळे संस्थेने समाजात आदर्श शिक्षण संस्था म्हणून लौकिक मिळवला आहे, असे प्रतिपादन माजी आमदार हेमंत टकले यांनी केले.

नाशिक एज्युकेशन सोसायटी व पेठे विद्यालयाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. शतक महोत्सवानिमित्त संस्थेने विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या नामवंत माजी विद्यार्थ्यांची १०० व्याख्याने आयोजित करण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे. याअंतर्गत संस्थेचे माजी विद्यार्थी हेमंत टकले यांचे व्याख्यान नुकतेच पार पडले. पेठे विद्यालय नाशिक शहराचे आदर्श सांस्कृतिक केंद्र असल्याचे सांगत आ. टकले यांनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या फेलोशिप उपक्रमात संस्थेच्या शिक्षकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले. संस्थेचे अध्यक्ष प्रा. सूर्यकांत रहाळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमास उपाध्यक्ष प्रा. दिलीप फडके, चंद्रशेखर मोंढे, कार्यवाह राजेंद्र निकम, सहकार्यवाह शैलेश पाटोळे, शाळा समिती अध्यक्ष चंद्रशेखर वाड, शिक्षक मंडळ अध्यक्ष प्रियांका निकम, उपाध्यक्ष नरेंद्र मोहिते, मुख्याध्यापक कैलास पाटील, कार्यकारी मंडळ सदस्य सरोजिनी तारापूरकर, भास्करराव कोठावदे, जयदीप वैशंपायन, सचिन महाजन, मोहन रानडे, कर्नल दिलीप देशपांडे, अरविंद ओढेकर, विजय मापारी, मनीषा देशपांडे, दिलीप अहिरे उपस्थित होते.

---------

बोधचिन्हाचे अनावरण

कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते शतकमहोत्सवी वर्षाच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. यानिमित्ताने वर्षभरात विविध उपक्रम राबविले जाणार असून, आजी-माजी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन प्रा. रहाळकर यांनी केले.

----------- फोटो : आर ला : २४ टकले -----------

Web Title: School Social Transformation Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.