क्रीडा दिनानिमित्त विद्यालयातील खेळाडूंचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 16:46 IST2020-08-29T16:44:42+5:302020-08-29T16:46:27+5:30

सिन्नर: तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयातील चार खेळाडूंनी राष्ट्रीय पातळीवर बॉलबॅडमिंटन व टेनिकॉईट खेळात नैपुण्य मिळविले आहे.

School players felicitated on the occasion of Sports Day | क्रीडा दिनानिमित्त विद्यालयातील खेळाडूंचा सत्कार

सिन्नर तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर विद्यालयात जागतिक क्रीडा दिनानिमित्त विद्यालयातील राष्ट्रीय व राज्य खेळाडूंच्या सत्कारप्रसंगी मुख्याध्यापक एस बी देशमुख, शरद रेवगडे यांच्यासह शिक्षक.

ठळक मुद्दे जागतिक क्रीडा दिनानिमित्त विद्यालयातील राष्ट्रीय व राज्य खेळाडूंच्या सत्कार

सिन्नर: तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयातील चार खेळाडूंनी राष्ट्रीय पातळीवर बॉलबॅडमिंटन व टेनिकॉईट खेळात नैपुण्य मिळविले आहे. जागतिक क्रीडा दिनाचे औचित्य साधून राज्य व राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू व क्रीडा शिक्षिका श्रीमती एम एम शेख यांचा सत्कार करण्यात आलेले. मुख्याध्यापक एस.बी.देशमुख, आर्मी आॅफिसर शरद रेवगडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिक्षक बी.आर चव्हाण, आर. व्ही निकम, एस. एम कोटकर, आर.टी. गिरी, एम.सी, शिंगोटे, सविता देशमुख, टी.के. रेवगडे, सी.बी, शिंदे, के. डी, गांगुर्डे, एस.डी. पाटोळे, आर. एस. ढोली, के.पी. साठे, ए. बी. थोरे उपस्थित होते.

 

Web Title: School players felicitated on the occasion of Sports Day