शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
4
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
5
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

भंगार बाजार भुईसपाट

By admin | Updated: January 8, 2017 01:37 IST

महापालिकेची कारवाई : प्रचंड पोलीस फौजफाटा, व्यावसायिकांना हादरा

नाशिक : महापालिकेने शहराच्या इतिहासात शनिवारी (दि.७) अनधिकृत बांधकामविरोधी सर्वांत मोठ्या कारवाईला सुरुवात केली. चुंचाळे शिवार व अंबड-लिंकरोडवर गेल्या २० वर्षांपासून अनधिकृतपणे वसलेल्या भंगार बाजारावर महापालिकेने प्रचंड पोलीस बंदोबस्तात बुलडोझर चालविला आणि ठरलेल्या नियोजनानुसार सहा विभागांपैकी दोन विभागांतील एकूण ९४ अनधिकृत बांधकाम भुईसपाट केले. व्यावसायिकांचा किरकोळ विरोध वगळता पहिल्या दिवशी मोहीम शांततेत पार पडली. बाजार वाचविण्यासाठी सारे प्रयत्न विफल ठरल्यानंतर महापालिकेने केलेल्या या कारवाईने भंगार बाजार व्यावसायिकांना हादरा बसला आहे. विस्तीर्ण भागात पसरलेल्या या भंगार बाजारविरोधी आणखी काही दिवस मोहीम सुरू राहणार आहे.
गेल्या वीस वर्षांपासून या ना त्या कारणाने अभय मिळत गेलेल्या अनधिकृत भंगार बाजारासाठी शनिवारचा दिवस काळा ठरला. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी भंगार बाजार हटविण्याचा निर्धार बोलून दाखविला आणि त्यानुसार, गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या नियोजनानंतर प्रत्यक्ष बाजारावर शनिवारी हातोडा पडला. महापालिकेने १५ डिसेंबर २०१६ रोजी भंगार बाजार व्यावसायिकांना नोटिसा बजावल्यानंतर आयुक्तांनी कारवाईसाठी ७ जानेवारीचा मुहूर्त निश्चित केला होता. त्यानुसार, सकाळी ७ वाजेच्या सुमारास अंबड-लिंकरोडवर जेसीबी, पोकलॅनसह वाहनांचा प्रचंड ताफा, पोलिसांचा फौजफाटा व महापालिकेच्या सहा पथकांतील सुमारे २५० कर्मचारी येऊन पोहोचले आणि ९ वाजेपासून प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात करण्यात आली. बजरंगनगरपासून ते दत्तमंदिर चौकापर्यंतच्या पहिल्या भागातील अनधिकृत शेड व पक्की बांधकामे हटविण्यात आली. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर चक्काचूर झालेले पत्रे व लोखंडाचा अक्षरश: खच पडला. काही व्यावसायिकांनी पथक येण्यापूर्वीच स्वत:हून जेवढा माल वाचविता येईल त्यासाठी प्रयत्न केले.