शहरं
Join us  
Trending Stories
1
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
2
अंत्यसंस्काराच्या दिवशी कापला केक; चितेवर ठेवण्यापूर्वी वडिलांनी साजरा केला मुलीचा वाढदिवस
3
भारत जागतिक अर्थव्यवस्थेचा प्रमुख विकास इंजिन, चीनची वाढ संथ; पाहा काय म्हणाल्या IMF प्रमुख
4
वर्षाला २० लाखाचं पॅकेज, ५ महिन्यापूर्वी केले लव्ह मॅरेज; २८ वर्षीय युवकानं स्वत:ला का संपवलं?
5
स्वतःवर गोळी झाडणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याची IAS पत्नी आली समोर; एफआयआर दाखल, कुणावर केले आरोप?
6
IND W vs SA W ICC Women's ODI World Cup Live Streaming : टीम इंडियाला हॅटट्रिकसह टेबल टॉपर होण्याची संधी, पण..
7
तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
8
"भाई, ती मुलगी नाही...एक पंजा अन्...!"; थेट वाघोसोबतच 'लिप लॉक' करताना दिसला तरुण, Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल
9
घरबसल्या महिन्याला ₹९२५० ची कमाई करुन देणारी पोस्टाची स्कीम! पण एक चूक पडेल भारी, बसू शकतो ३० हजारांचा फटका
10
बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज?
11
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
12
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
13
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
14
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
15
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
16
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
17
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
18
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
19
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
20
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...

लाडक्या नेत्याला साश्रुनयनांनी निरोप

By admin | Updated: May 12, 2017 00:55 IST

कळवण : राज्याचे माजी आदिवासी विकासमंत्री, पुनंद प्रकल्पाचे शिल्पकार ए.टी. पवार यांना दळवट या मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्ककळवण : राज्याचे माजी आदिवासी विकासमंत्री, पुनंद प्रकल्पाचे शिल्पकार ए.टी. पवार यांना हजारो जनसमुदायाच्या उपस्थितीत दळवट या मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलिसांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली.ज्येष्ठ चिरंजीव जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार व प्रवीण पवार, डॉ. विजया भुसारे, गीता गोळे यांनी दुपारी १२ वाजेच्या सुमारास आपल्या पित्याच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. यावेळीस पत्नी शकुंतला पवार, बंधू पांडुरंग पवार आदी परिवारातील सदस्यांसह हजारो जनसमुदाय उपस्थित होता.राज्याचे जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, माजी आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड, राज्यातील विविध मान्यवरांसह जिल्ह्यातील आजी, माजी आमदार, खासदार तसेच आदिवासी बांधवांसह शासकीय व निमशासकीय अधिकारी व कर्मचारी अंत्ययात्रेत सहभागी झाले होते.बुधवारी मुंबई येथे औषधोपचारादरम्यान पवार यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव दुपारी नाशिक निवासस्थानी तर सायंकाळी दळवट या मूळगावी आणण्यात आल्यानंतर निवासस्थान परिसरात चाहत्यांनी आक्रोश केला. अनेकांना अश्रू आवरणे कठीण झाले होते. कसमादे पट्ट्यातील विविध राजकीय पक्ष पदाधिकाऱ्यांसह विविध संस्थांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दळवट निवासस्थानी धाव घेऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.अंत्यदर्शनासाठी कळवण व सुरगाणा तालुक्यातील आदिवासी बांधवांनी गर्दी केली होती. रात्री उशिरापर्यंत अत्यंदर्शनासाठी आदिवासी बांधव येऊन आक्रोश करत आठवणींना उजाळा देत होते. पवार यांच्या अंत्यसंस्कारासाठी जिल्हाभरातून गर्दीचा ओघ वाढत असल्याने सर्वत्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.  यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, माजी मंत्री शोभा बच्छाव, आमदार डॉ. राहुल अहेर, जे.पी. गावित, जयंत जाधव, बाळासाहेब सानप, दीपिका चव्हाण, सीमा हिरे, नरहरी झिरवाळ, माजी आमदार अनिल अहेर, शांताराम अहेर, दिलीप बोरसे, जयप्रकाश छाजेड, संजय चव्हाण, नाशिकच्या महापौर रंजना भानसी, जिल्हा बॅँक अध्यक्ष नरेंद्र दराडे, मविप्र सरचिटणीस नीलिमा पवार, , जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रकाश वडजे, कळवण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. शशिकांत पवार, उद्योगपती बेबीलाल संचेती, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष विजयश्री चुंबळे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी आदींसह जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व शासकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी विविध मान्यवरांनी ए.टी. पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली.