ममदापुरच्या सरपंचपदी सयाजी गुडघे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 18:33 IST2021-02-17T18:33:02+5:302021-02-17T18:33:29+5:30

ममदापुर : येथील ग्राम पंचायतीच्या सरपंचपदी नम्रता पॅनलचे उमदेवार सयाजी गुडघे तर उप सरपंचपदी सुमन संजय म्हस्के यांची बिनविरोध ...

Sayaji kneels as Sarpanch of Mamdapur | ममदापुरच्या सरपंचपदी सयाजी गुडघे

ममदापुरच्या सरपंचपदी सयाजी गुडघे

ठळक मुद्देसुमन म्हस्के यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड

ममदापुर : येथील ग्राम पंचायतीच्या सरपंचपदी नम्रता पॅनलचे उमदेवार सयाजी गुडघे तर उपसरपंचपदी सुमन संजय म्हस्के यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

सोमवारी (दि.१५) सरपंच निवडीसाठी सर्वसाधारण सभा घेण्यात आली. यावेळी सरपंच व उपसरपंचपदी सर्वानुमते एकच अर्ज आल्याने सयाजी गुडघे यांचीव सुमन संजय म्हस्के यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
या निवडीबद्दल ममदापुरकरांनी पुष्पहार देऊन सत्कार केला. सर्व उपस्थितांनी व निवडून आलेल्या सर्व ग्रामपंचायत सदस्य भिकाजी गुडघे, टिलू मोरे, दिपक गुडघे, रंगुबाई साबळे, विठाबाई सदगीर, सुमन गुडघे, प्रतिभा वैद्य, सुरेखा सोनवणे, व आदींचा सत्कार करण्यात आला.

या निवड प्रक्रियेत निवडणूक मंडळ अधिकारी म्हणून ए. बी गायके, तलाठी ज्ञानेश्वर रोहकले, ग्रामसेवक भगवान गायके यांनी कामकाज पाहिले. बिनविरोध निवडणूकसाठी सीताराम साबळे, विलास गुडघे, गोरख वैद्य, सुदाम गुडघे, मारोती केरे, बाळासाहेब जाधव, सुंदरलाल गुडघे, संजय म्हस्के, भाऊसाहेब गुडघे, मच्छिन्द्र साबळे, सुकदेव गुडघे, भास्कर गुडघे, आबासाहेब केरे, साहेबराव गुडघे, देविदास गुडघे आदींचे सहकार्य लाभले.

Web Title: Sayaji kneels as Sarpanch of Mamdapur