जलतरण तलावात बुडणाऱ्या तरुणाला वाचवण्यात जीवरक्षकांना यश
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2019 10:21 IST2019-06-04T10:16:34+5:302019-06-04T10:21:51+5:30
नाशिक महापालिकेच्या स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव येथे सूर मारल्यानंतर बुडालेल्या एका तरुणालला जीवरक्षकांनी वाचवले आहे.

जलतरण तलावात बुडणाऱ्या तरुणाला वाचवण्यात जीवरक्षकांना यश
नाशिक - नाशिक महापालिकेच्या स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव येथे सूर मारल्यानंतर बुडालेल्या एका तरुणालला जीवरक्षकांनी वाचवले आहे. या घटनेनंतर तातडीने तरुणाला उपचारासाठी जवळच्या सिव्हिल रुग्णालयामध्ये दाखल केल्याने त्याचा जीव वाचला आहे. आज सकाळी साडे आठच्या सुमारास हा प्रकार घडला.
नाशिक महापालिकेचं स्वातंत्र्यवीर जलतरण तलाव असून दररोज सकाळी शेकडो सभासद येत असतात. आज सकाळी आदेश माने ( वय 23) याने पोहोण्यासाठी सूर मारली पण तो दीड ते दोन मिनिटे पाण्यातून वर आला नाही. या ठिकाणी नियुक्त असलेल्या लाईफ गार्डच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी तातडीने त्याला बाहेर काढले. पंपिंग करून शरिरातील पाणी बाहेर काढले. आणि तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. दोन पाच मिनिटे विलंब झाला असता तर ते तरुणाच्या जीवावर बेतले असते असे डॉक्टर यांनी सांगितलं आहे. नाशिकच्या या जलतरण तलावावर यापूर्वी अनेक दुर्घटना घडल्या आहेत.