आत्मसमर्पण दिनानिमित्त सावरकर यांना मानवंदना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 00:31 IST2019-02-26T23:46:40+5:302019-02-27T00:31:21+5:30
क्रांतिकारकाचे मेरोमणी भगूर पुत्र स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनानिमित्त भगूर शहर व नाशिक तसेच महाराष्ट्रातून आलेल्या विविध संस्था मान्यवरांनी सावरकर स्मारकात अभिवादन केले.

आत्मसमर्पण दिनानिमित्त सावरकर यांना मानवंदना
भगूर : क्रांतिकारकाचे मेरोमणी भगूर पुत्र स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनानिमित्त भगूर शहर व नाशिक तसेच महाराष्ट्रातून आलेल्या विविध संस्था मान्यवरांनी सावरकर स्मारकात अभिवादन केले. सकाळी सावरकर स्मारकात पुरातत्व विभागातर्फे सहायक अधिकारी जया वाहने यांच्या हस्ते सावरकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. याप्रसंगी सचिन पगारे, कृष्णा बालपांडे, विजयकुमार धुमाळ, किशोर बच्छाव, सोमनाथ बोराडेसह पुरातत्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पालिका सभागृहात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस नगराध्यक्ष अनिता करंजकर व मुख्याधिकारी प्रतिभा पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी कार्यालयीन अधीक्षक रमेश राठोड, अधिकारी नगरसेविका नगरसेवक व कर्मचारी उपस्थित होते.
भगुरपुत्र, स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचा ५३वा आत्मसमर्पण दिनानिमित्त वीरसावरकर उत्सव समिती, सावरकर फेसबुक संघ, विविध संघटना व मित्रमंडळांच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली.
सकाळी १० वाजता सावरकर फेसबुक संघाचे वतीने जन्म स्मारकात भगूर नगराध्यक्ष अनिता करंजकर, उपनगराध्यक्ष प्रतिभा घुमरे यांच्या हस्ते सावरकर जीवनावरील आधारित माहिती पुस्तिका प्रकाशित करण्यात आली, तर शिवाजी महाराज चौकात रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी ३५ सावरकर भक्तांनी रक्तदान केले.
भोसलाच्या बॅण्ड पथकाची भगूर येथे मानवंदना
नाशिक येथील भोसला मिलिटरी स्कूलच्या ३६८ विद्यार्थ्यांनी भगूरच्या शिवाजी चौकात बँंड पथकाच्या तालावर स्वा. सावरकरांना मानवंदना दिली. नाशिक येथील बागेश्री वाद्यवृंद चारुदत्त दीक्षित निर्मित यांनी सकाळी सावरकर स्मारकात देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम सादर केला. शिक्षण मंडळ भगूर नूतन प्राथमिक व उच्च माध्यमिक च्या विद्यार्थांनी सावरकरांच्या जीवनावर निबंध स्पर्धा घेण्यात आल्या त्याचे पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी हसानंद नेहलाणी, मधुसुदन गायकावड, रमेश शेटे, अशोक बोराडे, दिलीप काकडे, रामदास आंबेकर, जितेंद्र भावसार, चंद्रशेखर कोरडे, मृत्युंजय कापसे तसेच अभिनव प्राथमिक विद्यामंदिर, नूतन प्राथमिक विद्यामंदिर, ति. झा. विद्यामंदीर शाळेतील विद्यार्थ्यांनीही स्मारकात जाऊन अभिवादन करत नतमस्तक झाले.