पाथरशेंबे सरपंचपदी साठे बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 00:32 IST2020-07-08T21:12:12+5:302020-07-09T00:32:05+5:30
चांदवड : तालुक्यातील पाथरशेेंबे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कोंडाजी फकिरा साठे यांची बिनविरोध निवड झाली. पूर्वीचे सरपंच बाळू परशराम ठाकरे यांचे पद आयुक्तांच्या आदेशाने रद्द झाल्याने या जागेवर सदरची निवड करण्यात आली.

पाथरशेंबे सरपंचपदी साठे बिनविरोध
चांदवड : तालुक्यातील पाथरशेेंबे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कोंडाजी फकिरा साठे यांची बिनविरोध निवड झाली. पूर्वीचे सरपंच बाळू परशराम ठाकरे यांचे पद आयुक्तांच्या आदेशाने रद्द झाल्याने या जागेवर सदरची निवड करण्यात आली.
निवडणूक अधिकारी म्हणून चांदवडचे मंडळ अधिकारी एन. पी. शिंदे, आर.के. मगर, तलाठी किरण जैसवाल, ग्रामसेवक श्रीमती बच्छाव यांनी निवडणुकीचे काम बघितले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र काळू ठाकरे, मीराबाई खंडू साठे, संगीता अंबादास महाले आदी सदस्य उपस्थित होते. आठपैकी चार सदस्य गैरहजर होते. एकमेव अर्ज कोंडाजी फकिरा साठे यांचा आल्याने बिनविरोध निवड झाली आहे.
यावेळी अंबादास महाले, धोंडीराम साठे, कैलास शिंदे, राजाराम जोंधळे, भीमाजी साठे, भीमाजी सलादे, अशोक ठाकरे उपस्थित होते. निवडीनंतर नूतन सरपंच व सदस्यांनी आनंदोत्सव साजरा करीत गुलालाची उधळण केली. फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून यावेळी निवड करण्यात आली.