सरसंघचालक मोहन भागवत नाशिकमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 01:08 IST2018-08-22T01:08:30+5:302018-08-22T01:08:53+5:30
राष्टय स्वयंसवेक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत नाशिकमध्ये दाखल झाले असून, बुधवारी (दि. २२) ते शहरात मुक्कामी असणार आहेत.

सरसंघचालक मोहन भागवत नाशिकमध्ये
नाशिक : राष्टय स्वयंसवेक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतनाशिकमध्ये दाखल झाले असून, बुधवारी (दि. २२) ते शहरात मुक्कामी असणार आहेत.
शिर्डी येथे एका धार्मिक संमेलनासाठी मोहन भागवत यांचे मंगळवारी (दि. २२) आगमन झाले. सायंकाळी नाशिकरोड रेल्वेस्थानकावर त्यांचे आगमन होणार असल्याने पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शिर्डी येथील एका धार्मिक कार्यक्रमासाठी भागवत जाणार असून, तेथून ते नाशिकला परततील. बुधवारी (दि.२२) नाशिकमध्ये ते इंदिरानगर परिसरात संघाचे पश्चिम महाराष्टÑ प्रांत प्रचारप्रमुख दिलीप क्षीरसागर यांच्याकडे मुक्कामी असून, गुरुवारी (दि.२३) ते जनशताब्दी एक्स्प्रेसने मुंबईस रवाना होणार आहे. भागवत हे अनेकदा नाशिकला आले असले तरी त्यांचा मूळ शिर्डी दौरा असून, त्यामुळेच नाशिकमध्ये कोणताही कार्यक्रम नसल्याचे सांगितले जात आहे.