शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

बागलाणमध्ये ३८ गावांचे सरपंचपद राखीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 00:40 IST

सटाणा : बागलाण तालुक्यातील तब्बल ८२ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण गुरुवारी (दि २८) जाहीर करण्यात आले आहे. या आरक्षण सोडतीमध्ये बहुतांश सरपंचपद आरक्षित झाल्याने अनेकांचे मनसुभे उधळले तर अनेकांची लॉटरी लागली आहे.

ठळक मुद्दे प्रभारी तहसीलदार शुभम गुप्ता यांनी सरपंच पदाचे आरक्षण जाहीर केले.

सटाणा : बागलाण तालुक्यातील तब्बल ८२ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण गुरुवारी (दि २८) जाहीर करण्यात आले आहे. या आरक्षण सोडतीमध्ये बहुतांश सरपंचपद आरक्षित झाल्याने अनेकांचे मनसुभे उधळले तर अनेकांची लॉटरी लागली आहे.              येथील पंचायत समिती सभागृहात सकाळी ११ वाजता प्रभारी तहसीलदार शुभम गुप्ता यांनी सरपंच पदाचे आरक्षण जाहीर केले. ८२ ग्रामपंचायत पैकी ४४ ग्रामपंचायतीचे सरपंचपद खुले करण्यात आले आहेत. २२ ग्रामपंचायतींचे सरपंचपद ओबीसीसाठी तर अनुसूचित जमातीसाठी १२ आणि अनुसूचित जातीसाठी चार ग्रामपंचायतींचे सरपंचपद आरक्षित करण्यात आले आहे.

                  सरपंचपदाच्या सर्वसाधारण ग्रामपंचायतींमध्ये जुने निरपूर, सुराणे, फोपिर, ब्राम्हणपाडे, बिजोरसे, भाडाने, पारणेर, ब्राम्हणगाव, सारदे, सोमपूर ,उत्राणे, ठेंगोडा, जुनी शेमळी, रामतीर, निताने, बिजोटे, खमताने, पिंपळदर, दरहाणे,आखतवाडे, वाडीपिसोळ, औंदाणेपाडा, बोढरी, इजमणे, मोराणे सांडस, नळकस, मळगाव भामेर, श्रीपूरवडे, करंजाड, आराई, मोरेनगर, तांदुळवाडी, वाघळे, आनंदपूर, महड, टेंभे खालचे, तळवाडे भामेर, विरगाव, औदाणे ,चौंधाने, डोंगरेज, वटार, मुळाने, ताहाराबाद या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.                   ओबोसी आरक्षित गावांमध्ये कर्हे, काकडगाव, खामलोण, नवेगाव, नवे निरपूर, लाडूद, कोडबेल, दोद्धेश्वर झ्रकोळीपाडा, नवी शेमळी, तरसाळी, मळगाव तिळवण, टेंभे वरचे, खिरमणी, आव्हाटी, ढोलबारे, रातीर, देवळाने, यशवंतनगर, गोराणे,आसखेडा, वनोली,चिराई या ग्रामपंचायती आहेत.अनुसूचित जमाती आरक्षित ग्रामपंचायतींमध्ये आजमीर सौंदाणे ,पिंगळवाडे,अंबासन ,द्याने ,दरेगाव ,पिंपळकोठे ,लखमापूर ,जायखेडा ,चौगाव ,धांद्री ,कुपखेडा ,मुंजवाड या गावांचा समावेश आहे.अनुसूचित जातीसाठी नामपूर ,नांदिन,भाक्षी ,वायगाव या गावांचे आरक्षण पडले आहे. येत्या ३ फेब्रुवारीला महिला आरक्षण काढण्यात येणार आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतreservationआरक्षण