सराफी दुकान फोडून दोन लाखांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 18:14 IST2018-08-19T18:13:36+5:302018-08-19T18:14:08+5:30

नाशिक : शहरातील घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत चालली असून, हिरावाडीतील त्रिमूर्तीनगरमधील सराफी व्यावसायिकाचे दुकान फोडून चोरट्यांनी सुमारे दोन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (दि़१७) मध्यरात्री घडली़

Sarafa shop broke into two million stolen | सराफी दुकान फोडून दोन लाखांची चोरी

सराफी दुकान फोडून दोन लाखांची चोरी

ठळक मुद्दे हिरावाडीतील घटना

नाशिक : शहरातील घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत चालली असून, हिरावाडीतील त्रिमूर्तीनगरमधील सराफी व्यावसायिकाचे दुकान फोडून चोरट्यांनी सुमारे दोन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (दि़१७) मध्यरात्री घडली़

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवार कारंजावरील दूर्वांकुर अपार्टमेंटमधील रहिवासी रत्नाकर काशीनाथ वडनेरे यांचे हिरावाडीत माउली ज्वेलर्स या नावाचे सोने-चांदीच्या दागिने विक्रीचे दुकान आहे. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी या दुकानाच्या लोखंडी ग्रीलचे गज कापून व शटर उचकटून दुकानात प्रवेश केला़ यानंतर दुकानातील १ लाख ८७ हजार ५०० रुपये किमतीचे ७५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले़

या दागिन्यांमध्ये सोन्याचे मणी, मंगळसूत्र, लहान मुलांचे दागिने, कानाच्या रिंगा, झुबे आदींचा समावेश आहे. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: Sarafa shop broke into two million stolen