सानुग्रह अनुदान : शहिद पोलिसांच्या कुटूंबियांना ६० लाख रुपयांचा धनादेश प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 15:57 IST2020-06-17T15:56:42+5:302020-06-17T15:57:22+5:30

राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार कोरोना बंदोबस्तादरम्यान कोरोनाची लागण झाल्याने मृत्यू झाल्यास पोलिसांच्या कुटूंबियांना ५० लाख रुपयांचा सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Sanugraha grant: Provision of check of Rs. 60 lakhs to the families of martyred policemen | सानुग्रह अनुदान : शहिद पोलिसांच्या कुटूंबियांना ६० लाख रुपयांचा धनादेश प्रदान

सानुग्रह अनुदान : शहिद पोलिसांच्या कुटूंबियांना ६० लाख रुपयांचा धनादेश प्रदान

नाशिकजिल्ह्यात मालेगाव येथे कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव झाला. त्यात बंदोबस्तावर असलेले ग्रामीण पोलिसही बाधीत झाले. त्यापैकी तीन पोलीस शहिद झाले आहेत. कोरोनाची लागण होऊन शहिद झालेल्या नाशिक ग्रामीण पोलीस दलातील दोघा कर्मचाऱ्यांच्या  कुटूंबियांना सानुग्रह अनुदान व विमा रक्कमेचा प्रत्येकी ६० लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.
जगभरात कोरोनाचा कहर सुरु झाल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्यात आले. त्यात पोलिसांनाही बंदोबस्ताची महत्वपुर्ण जबाबदारी आहे. नाशिक जिल्ह्यात सुरुवातीस मालेगाव येथे कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव झाला. त्यात बंदोबस्तावर असलेले ग्रामीण पोलिसही बाधीत झाले. त्यापैकी तीन पोलीस शहिद झाले आहेत. राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार कोरोना बंदोबस्तादरम्यान कोरोनाची लागण झाल्याने मृत्यू झाल्यास पोलिसांच्या कुटूंबियांना ५० लाख रुपयांचा सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्र राज्य पोलीस दलातर्फेही शहिद पोलिसांना १० लाख रुपयांचा विमा देण्यात येत आहे. त्यानुसार ग्रामीण पोलीस दलातील शहिद पोलिसांच्या कुटूंबियांना प्रत्येकी ६० लाख रुपयांचे धनादेश प्रदान करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह, अपर पोलीस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी शहिद पोलिसांच्या कुटूंबियांची भेट घेत धनादेश दिले. 

Web Title: Sanugraha grant: Provision of check of Rs. 60 lakhs to the families of martyred policemen