शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधानांचा उपदेश की अपयशाचा पुरावा? देश चालवणं आता तुमच्या..." राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
2
Rohit Pawar : "भ्रष्टाचार करू नका, आता निवडणुका झाल्याने पंतप्रधानांचं आवाहन म्हणजे..."; रोहित पवारांचा निशाणा
3
Gold Silver Price Today: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर सोन्या-चांदीचे दर कमी झाले? जाणून घ्या लेटेस्ट दर
4
खळबळजनक! आई-वडिलांनीच दिली मुलाच्या हत्येसाठी ५,००,००० रुपयांची सुपारी
5
Jewellery Stocks Fall: पंतप्रधानांचं आवाहन आणि टायटन, सेनको, कल्याण यांना बसला फटका; लग्नसराईच्या हंगामात गोल्ड शेअर्स आपटले
6
मनालीची सफर ठरली अखेरची! चंबा-नूरपूर हायवेवर भीषण दुर्घटना; ६ जणांचा मृत्यू, ४ गंभीर
7
शिंदेसेनेच्या संघटनबांधणीसाठी श्रीकांत शिंदे राज्यव्यापी दौरा करणार, दोन महिन्यांत २२ जिल्हे पिंजून काढणार 
8
‘वाह मोदीजी वाह! अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेत आलेले आज पेट्रोल, डिझेल वापरू नका म्हणून सांगताहेत’  विजय वडेट्टीवार यांचा टोला
9
Nepal Plane Fire: नेपाळमध्ये काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! लँडिंग दरम्यान विमानाच्या टायरला आग; २८९ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले
10
थलापती विजयच्या शपथविधीनंतर तृषा कृष्णन गर्दीत अडकली; अभिनेत्रीच्या संयमाचं होतंय कौतुक
11
Canara Bank मध्ये ४४४ दिवसांच्या FD मध्ये २ लाख जमा केल्यास किती मिळेल व्याज, खात्यात एकूण किती रक्कम येईल?
12
कल्याण रेल्वे स्थानक की रेडलाइट एरिया ? मध्यरात्री तीन वाजेपर्यंत बेकायदा धंदे, पोलिसांचे नियंत्रण नाही
13
हार्दिक पांड्या आणि मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? इन्स्टावर अनफॉलो केलं, MI च्या गोटात काल रात्री असं काही घडलं
14
महामुंबई: मुंबई महापालिका निधी वाटपातील गटबाजीने भाजपमध्येच अस्वस्थता 
15
Chandranath Rath : मोठी कारवाई! सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ यांच्या हत्येप्रकरणी हिस्ट्रीशीटरसह ३ जणांना अटक
16
हंटाव्हायरसचा विळखा! ३ जणांचा मृत्यू झालेल्या क्रूझवरून भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; पुढे काय होणार?
17
केवळ पगारवाढीवर अवलंबून आहात का?; 'ही' ३ कारणे आहेत तुम्ही श्रीमंत होण्यातील अडथळा!
18
'असदुद्दीन ओवेसी हे ओसामा बिन लादेनसारखेच, त्यांच्यात काही फरक नाही', मंत्री नितेश राणेंचे विधान
19
Post Office मध्ये ३६ महिन्यांच्या एफडीमध्ये ₹२,००,००० जमा कराल तर किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
20
Adhik Maas 2026: अधिक मासात का लावली जाते वेणीमाधव वात? काय आहे वैशिष्ट्य, महत्त्व आणि लाभ? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

संजीवक बनवेगिरीचे धागेदोरे चीनपर्यंत? मास्टर मार्इंड सोलापुरात

By admin | Updated: November 30, 2014 00:49 IST

संजीवक बनवेगिरीचे धागेदोरे चीनपर्यंत? मास्टर मार्इंड सोलापुरात

  नाशिक : पिंपळगाव येथील महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या कार्यालयातून बनावट जी.अ‍े(जिब्रॅलिक अ‍ॅसीड)ची विक्री केल्याप्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असला तरी या समूळ बनावट औषधे बनविण्यामागे असलेला मास्टर मार्इंड मूळ सोलापूर जिल्'ातील असल्याचे समजते. तसेच ज्या कंपनीची ही बनावट जी.अ‍े. कीटकनाशक औषधे बनविण्यात आली ती कंपनी चीनची असल्याने या प्रकरणाचे धागेदोरे चीनपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. द्राक्ष वाढीसाठी आवश्यक असलेले जी.अ‍े. (जिब्रालिक अ‍ॅसिड) संजीवकाच्या पिंपळगाव येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी सुनील अहेर व प्रमोद निकम यांनी द्राक्ष बागायतदार संघाच्या विक्री केंद्रावरून १० ग्रॅम जी.अ‍े. या द्राक्ष वाढीसाठी आवश्यक असलेल्या संजीवकाची खरेदी केली होती. त्यांना संशय आल्याने त्यांनी तत्काळ याबाबत द्राक्ष बागायतदार संघाकडे याबाबत तक्रार केली. द्राक्ष बागायतदार संघाकडे तक्रार केल्यानंतर द्राक्ष बागायतदार संघाने याबाबत जिल्हा परिषदेच्या गुणवत्ता तक्रार व निवारण कक्षाकडे तक्रार केली. त्यानंतर ११ नोव्हेंबर रोजी द्राक्ष बागायतदार संघाच्या विक्री केंद्रावर या संजीवकांची विक्री करणाऱ्या चंद्रभान श्रीधर हांडोरे यांच्याकडे विक्रीसाठी असलेल्या जी.अ‍े.च्या बाटल्या व द्राक्ष बागायतदार संघाच्या गुदामातील बाटल्या यापैकी प्रत्येकी एक बाटल्यांचे नमुने घेऊन जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने ठाणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. त्याचा अहवाल कृषी विभागाला प्राप्त झाला. त्यात हांडोरे यांच्याकडील जप्त केलेले जी.अ‍े. संजीवक बनावट असल्याचे तर द्राक्ष बागायतदार संघाकडील जी.अ‍े. हे मूळ असल्याचे लक्षात आले. याप्रकरणाचा सूत्रधार संबंधित कंपनीतील पुणे स्थित कार्यरत एक सेवानिवृत्त अधिकारी असून तो मूळचा सोलापूर जिल्'ातील असल्याची चर्चा आहे. सोलापूरच्या कृषी विभागानेही याच कंपनीच्या बनावट औषधांप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे या औषधांची बनावटगिरी संपूर्ण राज्यभर तसेच देशातही इतरत्र करण्यात आल्याची चर्चा असून, पोलिसांच्या पंचनाम्यात संबंधित जी.अ‍े. या संजीवकांच्या बाटल्यांवर चीन येथील युनान हुयान इंटरनॅशनल असे लेबल आढळल्याने हे उत्पादन चीनमध्ये झाल्याची शक्यता आहे.(प्रतिनिधी)