वडनेर शिवारात वाळूचोरी; दोघांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2021 01:18 IST2021-12-18T01:17:57+5:302021-12-18T01:18:22+5:30

मालेगाव : तालुक्यातील मालेगाव - नामपूर रस्त्यावरील सावतावाडी शिवारातील मोसम नदीपात्रातून तीन हजार रुपये किमतीची एक ब्रास वाळू चोरी केल्याप्रकरणी ट्रॅक्टरचालक गोकुळ भगवान खैरनार व रोहित शेलार दोन्ही रा. अजंग यांचे विरोधात वडनेर खाकुर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

Sand theft in Wadner Shivara; Crimes against both | वडनेर शिवारात वाळूचोरी; दोघांविरुद्ध गुन्हा

वडनेर शिवारात वाळूचोरी; दोघांविरुद्ध गुन्हा

मालेगाव : तालुक्यातील मालेगाव - नामपूर रस्त्यावरील सावतावाडी शिवारातील मोसम नदीपात्रातून तीन हजार रुपये किमतीची एक ब्रास वाळू चोरी केल्याप्रकरणी ट्रॅक्टरचालक गोकुळ भगवान खैरनार व रोहित शेलार दोन्ही रा. अजंग यांचे विरोधात वडनेर खाकुर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस कर्मचारी गणेश सुकदेव जाधव यांनी फिर्याद दिली. विनापरवाना बेकायदेशीररीत्या टॅक्टर ट्रॉलीत वाळू भरून चोरट्या रितीने विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करताना मिळून आले. काल बुधवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून तीन हजार रुपये किमतीची एक ब्रास वाळू, तीन लाख ३० हजार रुपये किमतीचा महिंद्र कंपनीचा ट्रॅक्टर व टॉली जप्त करण्यात आली. अधिक तपास पोलीस नाईक खैरनार करीत आहेत.

Web Title: Sand theft in Wadner Shivara; Crimes against both