नांदूरमधमेश्वर, कळसूबाईसह उत्तर महाराष्टÑातील अभयारण्ये बंदच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 00:24 IST2020-07-09T20:09:28+5:302020-07-10T00:24:07+5:30
नाशिक : ताडोबा व्याघ्र प्रकल्प जरी पर्यटकांसाठी खुले करण्यात आले असले तरीदेखील उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे जिल्ह्णांतील नांदुरमधमेश्वर, कळसूबाई-हरिश्चंद्रगड, यावल, अनेर डॅम हे चारही अभयारण्य पर्यटकांसाठी पुढील आदेशापर्यंत जैसे-थे ‘कुलूपबंद’ राहणार आहे

नांदूरमधमेश्वर, कळसूबाईसह उत्तर महाराष्टÑातील अभयारण्ये बंदच !
नाशिक : ताडोबा व्याघ्र प्रकल्प जरी पर्यटकांसाठी खुले करण्यात आले असले तरीदेखील उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे जिल्ह्णांतील नांदुरमधमेश्वर, कळसूबाई-हरिश्चंद्रगड, यावल, अनेर डॅम हे चारही अभयारण्य पर्यटकांसाठी पुढील आदेशापर्यंत जैसे-थे ‘कुलूपबंद’ राहणार आहे. त्याचप्रमाणे नाशिकसह वरील जिल्ह्णांमधील वनविभागाच्या हद्दीतील दुर्गपर्यटन, निसर्ग पर्यटनावरही बंदी कायम आहे.
कोरोनाचे संक्र मण राज्यात अधिक वेगाने वाढत असून, सध्या पावसालाही सुरुवात झाली आहे. यामुळे अभयारण्यांच्या परिसरातील निसर्गसौंदर्यही खुलले आहे. यामुळे हौशी पर्यटकांची पावले वर्षासहलींचा आनंद घेण्यासाठी अभयारण्यांकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही; मात्र ग्रामीण भागात कोरोना नियंत्रणात ठेवण्यासाठी तसेच संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी वन-वन्यजीव विभागाच्या नाशिक वनवृत्तात येणाऱ्या वरील चारही जिल्ह्णांमधील अभयारण्य, राखीव वनक्षेत्र, दुर्ग परिसरात पर्यटनावर बंदी कायम ठेवण्यात आली आहे.
दि. १६ मार्चपासून वरील अभयारण्यांच्या वाटा पर्यटक, निसर्गप्रेमी, वन्यजीव छायाचित्रकारांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
---------------------
स्थानिक : गावकऱ्यांचाही पाठिंबा
बहुतांश गावे कोरोनाच्या संक्र मणापासून सुरक्षित राहिलेले आहे. यामुळे कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य असो किंवा नांदुरमधमेश्वर अभयारण्य असो या भागातील स्थानिक गावकºयांनीसुद्धा रोजगारावर पाणी सोडणे पसंत केले आहे; मात्र कोरोनाचा शिरकाव आपल्या गावांमध्ये होणार नाही यासाठी पर्यटनबंदीला पाठिंबा दर्शविला आहे.
---------------
पर्यटनबंदी ही फायदेशीरच आहे. गावकºयांच्या रोजगारावर त्याचा परिणाम नक्कीच झाला आहे; मात्र कोरोनाचे संक्र मण रोखण्यासाठी अभयारण्य पर्यटकांसाठी बंद राहणे योग्यच आहे. गाइडपासून तर गावकºयांपर्यंत सर्वांचीच सुरक्षा जोपासली जाणार आहे.
- अमोल दराडे, गाइड, नांदुरमधमेश्वर
------------------------
कळसूबाई अभयारण्य बंदच आहे. भंडारदरा गावासह सर्वच ग्रामपंचायतींनी पर्यटनबंदीचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय गावकºयांच्या हिताचा आहे. कोरोनामुळे पर्यटनावर गंभीर परिणाम झाला आहे. ‘पाहुणचार’ मार्चपासून संपूर्णत: लॉकडाऊन आहे.
- केशव खाडे, गाइड, भंडारदरा