शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

सिनेमागृहातील फटाकेबाजीबद्दल सलमानने टोचले कान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2021 10:56 PM

मालेगाव कॅम्प : मालेगावकरांचे चित्रपटप्रेम नवीन नाही. या ठिकाणी दर शुक्रवारी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाला अक्षरश: गर्दी उसळते. परंतु काही उत्साही प्रेक्षकांमुळे मालेगावचे नाव बदनाम होऊ पाहत आहे. शनिवारी (दि.२७) सुभाष चित्रपटगृहात सलमान खानच्या ह्यअंतिमह्ण या चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी काही उत्साही टोळक्याने फटाक्यांची आतषबाजी करत गोंधळ घातला. याप्रकरणी पोलिसांनी दखल घेत गुन्हा दाखल केला. परंतु या फटाकेबाजीची खुद्द सलमान खाननेदेखील गंभीर दखल घेतली असून, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून मालेगावातील या घटनेचा व्हिडीओ टाकून मालेगावचे नाव न घेता अशा प्रकारच्या घटनांचा निषेध करत उत्साही प्रेक्षकांचे कान टोचले आहे. असे धोकादायक प्रकार सार्वजनिक ठिकाणी न करण्याचे आवाहनदेखील सलमान खानने केले आहे.

ठळक मुद्देमालेगाव : इन्स्ट्राग्रामवरून केले आवाहन, उत्साही रसिकांना आवर घालण्याची मागणी

किशोर इंदोरकर,

मालेगाव कॅम्प : मालेगावकरांचे चित्रपटप्रेम नवीन नाही. या ठिकाणी दर शुक्रवारी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाला अक्षरश: गर्दी उसळते. परंतु काही उत्साही प्रेक्षकांमुळे मालेगावचे नाव बदनाम होऊ पाहत आहे. शनिवारी (दि.२७) सुभाष चित्रपटगृहात सलमान खानच्या ह्यअंतिमह्ण या चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी काही उत्साही टोळक्याने फटाक्यांची आतषबाजी करत गोंधळ घातला. याप्रकरणी पोलिसांनी दखल घेत गुन्हा दाखल केला. परंतु या फटाकेबाजीची खुद्द सलमान खाननेदेखील गंभीर दखल घेतली असून, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून मालेगावातील या घटनेचा व्हिडीओ टाकून मालेगावचे नाव न घेता अशा प्रकारच्या घटनांचा निषेध करत उत्साही प्रेक्षकांचे कान टोचले आहे. असे धोकादायक प्रकार सार्वजनिक ठिकाणी न करण्याचे आवाहनदेखील सलमान खानने केले आहे.सिनेमाचा मालेगावी मोठा इतिहास आहे. आवडत्या हिरोच्या ह्यएंट्रीह्णला प्रेक्षकांचा अतिउत्साह सिनेमागृह व इतर प्रेक्षकांना धोकादायक ठरत आहे. त्यामुळे या अतिउत्साही सिनेप्रेमींना वेसण घालण्याची मागणी शहरातून होत आहे. शुक्रवारी यंत्रमाग व इतर उद्योग बंद असतात. त्यामुळे या दिवशी प्रदर्शित होणाऱ्या नवीन चित्रपटांना गर्दी होते. शनिवारी सुभाष या सिनेमागृहात सलमान खानच्या एन्ट्रीला अतिउत्साही सिनेप्रेमींनी अक्षरशः सिनेमागृहात फटाके फोडत रॉकेट उडवले. यामुळे सिनेमागृहात एकच गोंधळ उडाला व अन्य प्रेक्षकांमध्ये घबराट निर्माण होऊन पळापळ सूरू झाली.

या घटनेची माहिती कानोकानी, सोशल मीडियावर सर्वत्र पसरली. घटनेची माहिती सोशल मीडियामुळे चित्रपटाचा नायक सलमान खान यांना मिळाली. सलमान खानने याची गंभीर दखल घेत इन्स्टाग्रामच्या माध्यमातून मालेगावातील या घटनेचा व्हिडीओ टाकून अशा प्रकारच्या घटनांचा निषेध केला व असे धोकादायक प्रकार सार्वजनिक ठिकाणी न करण्याचे आवाहन केले. सलमान खानसह पिंकव्हिला, फिल्म फेअर, बॉम्बे टाइम या सोशल मीडिया हँडलवर मालेगावातील घटनेचा व्हिडीओ टाकून असे प्रकार न करण्याचे आवाहन केले गेले. मालेगावी आवडत्या नायकांचे फँन क्लब नाही तरीही काही नायकांचे समूह गट तयार झाले असल्याची माहिती आहे. हे गट आवडत्या नायकांचे चित्रपट पाहताना असा आततायीपणा करतात. यामुळे इतर प्रेक्षक वेठीस धरले जात असल्याने शहरात संताप व्यक्त केला जात आहे.अतिउत्साहीपणामुळे चिंता वाढल्यायापूर्वी मालेगावी असे प्रकार होत नव्हते असे नाही. पूर्वी सिनेमागृहात आवडत्या नायकाची एण्ट्री झाल्यावर पैशांची चिल्लर, नाणेफेक होत होती, तर काही महाभाग आवारातील कॅन्टीनमधून कपबश्या चोरून खिशात आणत व त्या अतिउत्साहीपणे पदड्यावर फेकत असत. यामुळे एकच गोंधळ उडायचा. प्रसंगी हाणामारीचे प्रकार सिनेमागृहात होत असत. आता चिल्लर पैसे, कपबश्या फेकणे हे प्रकार बंद झाले असले तरीही फटाके फोडणे हा प्रकार वाढला असल्याने चित्रपटगृह मालक व प्रेक्षकांची चिंता वाढली आहे.शासनाने दिलेल्या नियमानुसार चित्रपटगृह सुरू केले आहेत तर नवीन प्रदर्शित व आवडत्या नायकांचे चित्रपट पाहण्यासाठी गर्दी होते आहे. आम्ही सर्व प्रेक्षकांची तपासणी करून प्रवेश देत आहोत. तरीही काही वेळा गर्दीमुळे फटाके व इतर वस्तू नकळतपणे चित्रपटगृहात आणले जातात. यापुढे आम्ही अजून चांगल्या पद्धतीने तपासणी करून प्रेक्षक आत सोडू. यासाठी अतिरिक्त कर्मचारी व पोलिसांची मदत घेऊ.- सूभाष सूर्यवंशी, संचालक, सुभाष चित्रपटगृह, मालेगावमालेगावातील सर्व चित्रपटगृहांना शासनाने दिलेल्या नियमानुसार चित्रपटगृह सुरू करण्याबाबतीत नोटीस बजावली आहे. त्यांनी जमल्यास जास्त कर्मचारी व इतर सुरक्षाव्यवस्था ठेवली पाहिजे. जेणेकरून फटाके फोडण्याचे प्रकार व इतर गोष्टींवर नियंत्रण ठेवता येईल. पोलीस प्रशासनदेखील यासाठी सहकार्य करीत आहे.- एस. पी. गायकवाड, पोलीस निरीक्षक, छावणी पोलीस ठाणे, मालेगाव

टॅग्स :MalegaonमालेगांवCrime Newsगुन्हेगारी