शहरं
Join us  
Trending Stories
1
कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय?
2
Eknath Shinde Helicopter : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर वादळामुळे भरकटले; पायलटने प्रसंगावधान राखत केले यशस्वी लँडिंग
3
Hantavirus Outbreak : जगावर नवं संकट! 'हंटा व्हायरस'चा भीषण उद्रेक; जहाजावरील प्रवाशांचे पलायन, आता संसर्गाचा मोठा धोका
4
Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त
5
पार्किंगचा दर ऐकून गाडी घरीच ठेवाल! ४० टक्के दरवाढीचा झटका; सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नवे दर लागू
6
कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल
7
विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे?
8
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
9
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
10
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
11
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
12
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
14
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
15
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
16
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
17
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
18
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
19
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

साकोरा रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 16:44 IST

साकोरा-नांदगाव तालुक्यातील साकोरा रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे.तीन किलोमीटरच्या या रस्त्यावर उड्डानपुलापर्यंत धुळीचे साम्राज्य तर पुढे रस्ताच जलमय झाला असल्याने खड्ड्यांमधून वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.

ठळक मुद्दे धुळीचे साम्राज्य : वाहनधारकांमध्ये संतापाची लाट.


नांदगाव ते साकोरा या तीन किलोमीटरच्या रस्त्यावर उड्डानपुलापर्यंत नवीन रस्त्याचे काम चालू असल्याने संबंधीत ठेकेदाराने पर्यायी कुठलाही नवीन रस्ता उपलब्ध करून न दिल्याने परिसरातील तब्बल वीस ते बावीस गावांतील वाहनचालकांना खड्डेमय , प्रचंड धुळीच्या रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे.तसेच पुढे याच रस्त्यावर शिवमळा ते साकोरा रस्त्यांवरील मोरखडी मातीनाला बंधारा यावर्षी शंभर टक्के पाण्याने भरल्याने त्याचे पाणी गेल्या चारमहिन्यांपासून या रस्त्यावर वाहत असल्यामुळेखड्डे पडले आहेत. या मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले असल्याने वाहनधारकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.नांदगाव हे तालुक्याचे ठिकाण असल्याने साकोरा रस्त्यावरून कळमदरी,मंगळणे,काकळणे, वेहळगांव,सावरगाव,पळाशी,पांझण,जामदरी, तळवाडे,सायगांव,पिलखोड,गिरणाडॅम,आमोदे,बोराळे, अशा तब्बल वीस ते बावीस गावांतील वाहनचालकांना याच रस्त्यावरून मोठी कसरत करून नांदगाव येथे यावे लागते.
दोन वर्षांपूर्वी या रस्त्यावर असेच पाणी वाहत असल्यामुळे वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडत होती.त्या अनुषंगाने संबंधित विभागाने या ठिकाणी दोन जागेवर मोरी टाकून तसेच सुरूंग लावून पाणी मोकळे वाहून रस्त्यावर भर टाकून रस्ता उंच करणेकामी लाखो रूपये कागदोपत्री खर्च केले असल्याची माहिती मिळाली आहे.सुरूवातीला रस्त्याच्या कडेने दोन्ही बाजूने मोठी चारी करून पाण्याला मोकळी वाट करून दिली असती तर आज अशी दुरवस्था झाली नसती असे अनेक नागरिक बोलून दाखवत आहे.संबधीत दोन्ही विभागाच्याअधिकाऱ्यांनी येवून पाहणी करून या रस्त्याचे काम तत्काळ सुरू करावे अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

साकोरा ते नांदगाव या तीन कि.मी.च्या अंतरात खड्डे पडले असून, पाण्याच्या खड्ड्यातून तसेच धुळीत प्रवास करावा लागत आहे.त्यामुळे अनेकांना डोळ्यांचे तसेच मनक्याचे आजार जडले आहेत.
संबंधित विभागाने त्वरीत या रस्त्याची दुरु स्ती करावी.
-योगेश पाटील रहिवासी.
या रस्त्यावर आमचे रोजचेच जाणे-येणे चालू असल्याने वाहनांचाआणि वाहनचालकांंनापाठदुखीचा आजार झाला आहे.त्यामुळे बाहेरगावी दुध घेऊन जाणे अवघङझालेआहे.म्हणजे नुकसान करवून घेणे झाले आहे.
-दत्तू शेवाळे , रहिवासी.(08साकोरारस्ता)