शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी कर्जमाफीसाठी राज ठाकरे यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 00:30 IST

येवला : तालुक्यातील शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेऊन साकडे घातले. यावेळी ठाकरे यांना निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देअस्मानी संकटातून सावरताना शेतकर्‍यांवर कोरोनाचे संकट आले.

येवला : तालुक्यातील शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेऊन साकडे घातले. यावेळी ठाकरे यांना निवेदन देण्यात आले.

अतिवृष्टीने शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. अस्मानी संकटातून सावरताना शेतकर्‍यांवर कोरोनाचे संकट आले. त्यामुळे शेतकरी अर्थिक संकटात सापडला. गेल्या अनेक वर्षांपासून शेतकर्‍यांच्या कर्जमाफीची घोषणा होत आहे, त्यात शासनाकडून व्याजासह दोन लाखापर्यंत असणारी कर्जाची रक्कम माफीसाठी ग्राह्य धरण्यात आल्याने ज्या शेतकर्‍यांचे कर्ज मुद्दल किंवा व्याजासह दोन लाखाच्या वर आहे अशा अनेक शेतकर्‍यांवर अन्याय झाला असल्याचे निवेदनात म्हटले आहे. मार्च महिना जवळ येत असल्याने बँका वसुलीसाठी दारात येऊन बसत आहे. शेतकर्‍यांना नोटिसा बजावत आहेत. महावितरण कंपनीने वीजबिल वसुलीसाठी वीज खंडित करण्याचे काम सुरू केले आहे. अस्मानी, सुलतानी संकटांन बेजार झालेल्या शेतकर्‍यांना शासनाने दिलासा द्यावा, अशी अपेक्षा असताना सरकारही दुर्लक्ष करत असल्याने शेतकरी हवालदिल झाल्याचे निवेदनात म्हटले आहे.निवेदनावर भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष हितेश दाभाडे, महेश लासुरे, संदीप मखरे, प्रवीण खैरनार,गोकुळ लोहकरे, शंकर झाल्टे, रामभाऊ निकम, देवीदास पाटील, बहिरू झाल्टे, कैलास कदम आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसे