उलट्या पावलांनी देशभर भ्रमण करणारे सदगुरू साईराम गुरूजी शिर्डीकडे रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 20:43 IST2019-11-13T18:55:24+5:302019-11-13T20:43:26+5:30
वरखेडा : सद्याच्या कलियुगात समाजाला दिशा देण्याचे काम साधू-संत करीत आहे. कुणी सत्संगातून तर कुणी प्रवचनांतून मात्र गुजरात राज्यातील मीनी शिर्र्डी तिर्थधाम साईप्रेम आनंद आश्रमातील परमहंस सदगुरू साईराम गुरूजी यांनी संपूर्ण देशभर उलट्या पावली भ्रमण केले असून, नाशिक मार्गे श्री साईबाबांच्या चरणी लीन होण्यासाठी मार्गस्थ झाले.

उलट्या पावलांनी देशभर भ्रमण करणारे सदगुरू साईराम गुरूजी शिर्डीकडे रवाना
वरखेडा : सद्याच्या कलियुगात समाजाला दिशा देण्याचे काम साधू-संत करीत आहे. कुणी सत्संगातून तर कुणी प्रवचनांतून मात्र गुजरात राज्यातील मीनी शिर्र्डी तिर्थधाम साईप्रेम आनंद आश्रमातील परमहंस सदगुरू साईराम गुरूजी यांनी संपूर्ण देशभर उलट्या पावली भ्रमण केले असून, नाशिक मार्गे श्री साईबाबांच्या चरणी लीन होण्यासाठी मार्गस्थ झाले.
गुजरात मधील भरूज आश्रमाचे परमहंस गुरूजी रामनवमी, गुरूपौर्णिमा, दसरा, दिवाळी व दत्त जयंती उत्सवानिमित्ताने वर्षभरातून पाच वेळा नाशिक मार्गे साईबाबाच्या चरणी लीन होण्यासाठी उलट्या पावलांनी चालत समाजाला सरळ मार्गी चालण्याचा संदेश देत आहे. उलट्या पावली चालतानापाहून बाबांचे अनेक भाविक, भक्त नतमस्तक होतात.
गुरूजी सुमारे ४४ वर्षापासून उलट्या पावली देशभर भ्रमण करीत असून, आजपावतो त्यांनी गुजरात ते आयोध्या, हरिद्वार, पशूपतिनाथ, अजमेर, पंजाब, अंमरनाथ व नर्मदा परिक्र मा उलट्या पावलांनी चालत पुर्णं केल्या आहेत.
मी उलट्या पावली चालून जनतेने सच्चाईचा मार्ग अवलंबला पाहिजे, हा संदेश जनतेला देत आहे. शिवाय भरूज आश्रमात सदैव अन्नदान सेवा सुरू असून, नर्मदा परिक्र मा करणारे हजारो भाविक भक्त मीनी शिर्डी तिर्थधाम, साईप्रेम आनंद आश्रमात विसावा घेवूनच परिक्र माचा मार्ग अवलंबतात.
- सदगुरू साईराम गुरूजी, भरूज आश्रम.