आंबेवणीत सत्संग सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 02:41 PM2019-02-04T14:41:39+5:302019-02-04T14:42:16+5:30

वरखेडा : जो मनोभावे भगवंताची पुजा - अर्चा करतो, नामस्मरण करून भजतो त्याच्या भक्ती भाव ,सेवा पाहून भगवंताची प्राप्ती झाल्या शिवाय राहत नाही.असे प्रभूभाई पटेल यांनी सत्संग सोहळ्या प्रसंगी उपस्थित भाविक भक्तांशी हितगुज करतांना केले.

Sage Festival in Ambeet | आंबेवणीत सत्संग सोहळा

आंबेवणीत सत्संग सोहळा

googlenewsNext

वरखेडा : जो मनोभावे भगवंताची पुजा - अर्चा करतो, नामस्मरण करून भजतो त्याच्या भक्ती भाव ,सेवा पाहून भगवंताची प्राप्ती झाल्या शिवाय राहत नाही.असे प्रभूभाई पटेल यांनी सत्संग सोहळ्या प्रसंगी उपस्थित भाविक भक्तांशी हितगुज करतांना केले.
दिंडोरी तालूक्यातील घोडेवाडी, आंबेवणी येथे श्री १००८ श्री सत्यनारायण महापुजा व शोभायाञा कार्यक्र म प्रसंगी गुजरात राज्यातील श्री प्रगटेश्वर महादेव मंदीर भक्तीधाम आछवणी येथील धर्माचार्य बापूजी हे सत्संग सोहळ्या प्रसंगी भाविक भक्तांशी हितगुज करतांना केले.
यावेळी घोडेवाडी व आंबेवणी येथे ढोलताशाच्या गजरात ,हर हर महादेवच्या जयघोषात सवाद्य मिरवणूकी काढण्यात आली. गावातील सुवासिनीनी सडा-रांगोळी काढून औक्षण केले. दोन दिवसीय धार्मिक कार्यक्रमात पहिल्या दिवशी शोभायाञा, सत्संग व दुसऱ्या दिवशी सामुदायिक सत्यनारायण महापुजा आदी विविध कार्यक्र म व महाप्रसादाने सांगता करण्यात आली. सामुदायिक सत्यनारायण महापुजा व सत्संग सोहळ्या प्रसंगी वरखेडा, आंबेवणी, घोडेवाडी, परमोरी, राजापूर, सोनजांब, तळेगाव वणी, बोपेगाव आदिसह पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घेतला. यावेळी देवराम पडोळ, चंदू तिकडे, आर के खांदवे, पांडुरंग मातेरे, सोपान दिघे, कैलास वडजे, रामदास घोडे, योगेश खांदवे उपस्थित होते. (०४ वरखेडा)

Web Title: Sage Festival in Ambeet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक